प्रश्न.१ ला. खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.
अ) लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत.
उत्तर – आस्था/परोपकार
आ) ‘माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त’.
उत्तर – ममता/मायाळू
इ) “मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे.”
उत्तर – सहानुभूती
ई) “मॅडम, तुम्हांला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती.”
उत्तर – कृतज्ञता
उ) त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं.
उत्तर – सहसंवेदना
प्रश्न. ३ रा. शेख महमंदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते ?
उत्तर – गरजेच्या वेळी घेतलेले पैसे खर्च भागल्यावर ते पैसे प्रामाणिकपणे परत करायला हवेत. उसने घेतलेल्या पैशांचा व्यवहार हा काटेकोर आणि प्रामाणिकपणे करायला हवा. ज्या हेतूसाठी पैसे उसने किंवा कर्जाने घेतले होते तो हेतू त्या पैशांतून पूर्ण व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे ही खूप मोलाची शिकवण झुबेदाच्या कृत्यातून आपल्याला शिकायला मिळते.
प्रश्न. ४ था. लेखिकेची तब्बसूम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा.
उत्तर – या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थांनी स्वमताने स्वतः लिहायचे आहे.