प्र. १. खालील आकृती पूर्ण करा.
(अ) —– बाली बेटावरील विविध ललित कला ——
उत्तर – नृत्य, गायन, चित्र, शिल्प
प्र. २. खालील कल्पना स्पष्ट करा.
(अ) बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.
उत्तर – इंडोनेशिया देश म्हणजे रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी जसे सर्वत्र पसरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. कंठमण्यातील खूप महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो, तसेच महत्वाचे बाली बेट आहे. म्हणून लेखक म्हणतात कि बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.
आ) बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.
उत्तर – बाली बेटावरील अधिकारी पर्यटकांचे मनःपूर्वक स्वागत करतात. बाली बेटाचे पर्यटन खाते खूप जास्त तत्पर आहे. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे, असे लेखक म्हणतात.
इ) ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
उत्तर – अपरात्री लेखक हॉटेल सागर बीचमध्ये गेले, तरीही त्यावेळी हॉटेलमधील स्वागत विभागातले तरुण स्वागतासाठी लेखकाकडे आले. त्या तरुणांनी थोडाही त्यांच्या चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत केले. त्यावरून लेखक म्हणतात की ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
ई) बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.
उत्तर – समुद्रकिनाऱ्यालगत एक सुंदर बाग होती. फळांनी आणि फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही खूपच जास्त टवटवीत दिसत होती. लेखकाच्या मते फुले पाहुण्यांना न्याहाळत होती आणि वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. बाली बेटावरील ही बाग या सर्व कारणांमुळे एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती.
प्र. ४. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(अ) पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.
उत्तर – झोपल्यानंतर रात्री झोपेत स्वप्न पडतात. स्वप्नांची दुनिया हि अतिशय रम्य आणि अद्भुत असते. आपण जेव्हा पहाटे उठतो तेव्हा जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया नाहीशी होते. म्हणजेच याचा अर्थ पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते असे म्हणतात.
आ) पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.
उत्तर – रात्री खूप उशिरा लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या हॉटेलमधील तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा थोडा ही ताण नव्हता. पटापट त्या तरुणांनी प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्याच्या दाखवलेल्या खोलीत प्रवेश केला आणि लगेच ते खूपच गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरु लागले. म्हणून लेखक म्हणतात पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.
इ) वेलींचेही अंगधुणे झाले होते.
उत्तर – बाली बेटावरील सागर बीच हॉटेलच्या सभोवतालची बाग पहाटेही खूपच टवटवीत दिसत होती. वेली पहाटे पडलेल्या दवामुळे ओल्याचिंब झाल्या होत्या. त्यांना पाहून असे वाटत होते कि जणू काही वेलींची अंघोळच झाली होती कि काय. म्हणून लेखक म्हणतात वेलींचेही अंगधुणे झाले होते.
ई) त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.
उत्तर – पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट (गायक) होय. लेखकांना पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकू आली नाही,त्यामुळे लेखक स्वतः गाऊ लागले. लेखकांनी पक्षीरुपी भाटांची (गायकांची) उणीव स्वतःच्या गाण्याने भरून काढली. म्हणून लेखक म्हणतात त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.
विचार करा. सांगा.
• बाली बेटावर पक्षी का नसतील ?
• आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत ?
खेळूया शब्दांशी.
अ) खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या.
(अ) टुरिस्टांचा स्वर्ग.
(आ) किर्र जंगल.
(इ) अश्राप माणसे.
(ई) गाणारे भाट.
(उ) तंबूतला सिनेमा.
आ) खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा.
(अ) अभंग –
(आ) बोट –
(इ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
(१) उभयता
(२) यत्किंचितही
(३) चौघडा
(४) चित्रविचित्र
उपक्रम :
पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके मिळवा. वाचा.
शोध घेऊया.
(अ) आंतरजालाच्या साहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पाहा. आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रांत कोणती बेटे आहेत याचे निरीक्षण करा व त्याची नोंद करा.
देश –
लाभलेला समुद्रकिनारा –
तेथील बेटे –
आ) आंतरजालाच्या साहाय्याने अंदमान-निकोबार या बेटांची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे मिळवा.
(१) तेथील आदिवासी
(२) आदिवासींचे जीवनमान
(३) निसर्गसौंदर्य
(४) तेथील सोईसुविधा