10 . प्राचीन भारत : सांस्कृतिक


प्र १ .खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

१ ) प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा .

उत्तर -प्राचीन भारतातील तक्षशिला , वाराणसी , वल्लभी ,नालंदा ,विक्रमशिला ,कांची येथे विद्यापीठे होती .

२ ) कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे , त्याची यादी करा .

उत्तर - तलम कापड , हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ ,उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे .

प्र.२ नावे लिहा .

प्राचीन भारतातील महाकाव्ये - रामायण व महाभारत .

प्र. ३ . रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

१ ) रामायण हे महाकाव्य ......ऋषींनी रचले .

२ ) भारतीय वैद्यकशास्त्राला ...... असे म्हटले जाते .

३) हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय ......विद्यापीठात होती .

उत्तरे - १ ) वाल्मिकी २) आयुर्वेद ३) नालंदा


प्र ३ . थोडक्यात उत्तरे लिहा .

१ ) तिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा ?

उत्तर - तिपिटकांमध्ये तीन पिटक आहेत .पिटक म्हणजे पेटी याचा अर्थ विभाग असा आहे .तिपिटक पालिया भाषेत लिहिले आहे .तीन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे .यात सुत्तपिटक ,विनयपिटक , अभिधम्मपिटक यांचा समावेश होतो .

२ ) भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे ?

उत्तर - भगवतगीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ मानला जातो .फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपआपले कर्तव्य करावे , असे भगवद्गीतेत सांगितले आहे . ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे , असे त्यात सांगितले आहे .

३) आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे ?

उत्तर - आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे , रोगांचे निदान ,रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे . त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे ,याचाही विचार करण्यात आला आहे .

४) संघम साहित्य म्हणजे काय ?

उत्तर - संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा .या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संघम साहित्य म्हणून ओळखले जाते .हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे .संघम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते .या साहित्यातील सिलप्पधिकरम आणि मनिमेखलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत .

प्र.४. चर्चा करा .

मौर्य आणि गुप्तकाळातील स्थापन व कला .

उत्तर - मौर्य आणि गुप्तकाळातील भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला . सम्राट अशोकाने ठिक ठिकाणी उभारलेले .दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट उदाहरणे आहेत .सांची येथील स्तूप आणि उदयागिरी , खंडगिरी ,कारले , नाशिक ,अजिंठा-वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते .गुप्तकाळात भारतीय मूर्ती कलेचा विकास झाला .दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला .पल्लव राजसत्तेच्या काळात देव-देवतांच्या कांस्यमूर्ती बनवण्यास सुरुवात झाली होती . दिल्ली जवळील मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन स्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातू शास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते .

Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال