11. प्राचीन भारत आणि जग


प्र .१ . ओळखा पाहू .

१) रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे - महाराष्ट्रातील कोल्हापूर व तामिळनाडूतील अरिकामेडू .

२ ) कुशान काळात भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला ती शैली - गांधार शैली .

३ ) महावंस आणि दीपवंस या ग्रंथांची भाषा - पाली

४ ) प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश - चीन ,श्रीलंका , जपान ,कोरिया, व्हिएतनाम ,इंडोनेशिया , थायलंड ,म्यानमार इत्यादी .

प्र.२ . विचार करा आणि लिहा .

१ ) आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो .

उत्तर - आग्नेय अशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी-छोटी राज्ये उदयाला आली होती .या राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला .इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत यातील कथांवर आधारित नृत्य नाट्य लोकप्रिय आहेत . आग्नेय अशियातील राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला .नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांचीही निर्मिती झाली . म्हणून आग्नेय अशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो .

२) चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली .

उत्तर - इसवीसनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट 'मिंग ' याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यपमातंग हे बौद्ध भिखु चीनमध्ये गेले .त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले .त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली .

प्र ३ . तुम्ही काय कराल ?

तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल ?

उत्तर - याचे उत्तर तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार लिहा .

प्र.४ . चित्र वर्णन करा .

आपल्या पाठातील अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैली च्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्रवर्णन करा .

प्र ५ . अधिक माहिती मिळवा .

१ ) गांधार शैली

सिकंदर या मार्गांनी आला ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुले झाले .ग्रीक मूर्तिकलेचा प्रभावातून कुशान काळात भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला . त्याला गांधार कला असे म्हणतात . गांधार कलाशैली यात प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या . या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते .

२ ) रेशीम मार्ग

प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते .चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापड आला भारतात चिनाशुंक असे नाव होते . चिनाशुंकाला भारतात मोठी मागणी होती .प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनाशुंक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत .हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात .भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली आहेत .भारतात आलेले फाहियान आणि युआन श्वांग हे बौद्ध भिक्खूही रेशीम मार्गनेच भारतात आले .


Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال