१. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा.
(१) भारतातील कार्यकारी सत्ता ..... यांच्याकडे असते.
(राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती)
(२) राष्ट्रपतीचा कार्यकाल ..... वर्षांचा असतो.
(तीन, चार, पाच)
(३) मंत्रिमंडळाचे नेतृत्व ...... करतात.
(पक्षप्रमुख, प्रधानमंत्री, राष्ट्रपती)
उत्तरे - १ ) राष्ट्रपती २) पाच ३) प्रधानमंत्री
ओळखा आणि लिहा.
(१) राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे
नाव -
उत्तर: कार्यकारी मंडळ
(२) अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ हा या नावाने ओळखतात -
उत्तरः शून्य प्रहर
३. पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.
(१) महाभियोग प्रक्रिया
उत्तर: संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींची असल्याने त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग
करणारे असल्याचे सिद्ध झाल्यास पुढील महाभियोग प्रक्रिया पार पाडून राष्ट्रपतींना पदावरून दूर करता
येते
(१) संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहात महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येतो.
(२) एका सभागृहाने राष्ट्रपतींवर केलेल्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते.
(३) दोन्ही सभागृहांनी महाभियोगाचा प्रस्ताव विशेष बहुमताने मंजूर केल्यास राष्ट्रपतींना आपले पद सोडावे
लागते. या सर्व प्रक्रियेला 'महाभियोग प्रक्रिया' असे म्हणतात.
(२) अविश्वास ठराव.
उत्तर : (१) भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संसदीय शासनपद्धतीत कार्यकारी
मंडळ आपल्या कामाबाबत कायदेमंडळाला जबाबदार असते.
(२) लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असेपर्यंतच मंत्रिमंडळ अधिकारावर राहू शकते.
(३) 'आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही' असे म्हणून संसद सदस्य मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव आणू
शकतात.
(४) हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा दयावा लागतो. 'अविश्वासाचा ठराव आणणे
हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.
(३) जम्बो मंत्रिमंडळ.
उत्तर: (१) मंत्रिमंडळात अधिक सदस्यांचा समावेश असणाऱ्या मंत्रिमंडळाला 'जम्बो मंत्रिमंडळ' असे म्हटले
जाते.
(२) आपले हितसंबंध टिकून राहण्यासाठी जम्बो मंत्रिमंडळ ठेवण्याकडे कल असे.
(३) त्यामुळे मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवण्यासाठी संविधानात दुरुस्ती करण्यात आली.
(४) या दुरुस्तीनुसार लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त मंत्रिमंडळाची संख्या
असणार नाही, असे निश्चित करण्यात आले.
या दुरुस्तीमुळे अनेक जणांची मंत्रिमंडळात सोय लावण्याच्या वृत्तीला आळा बसला व प्रमाणापेक्षा जास्त
मंत्र्यांवर होणारा शासनाचा खर्च वाचला.
४. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर: मंत्रिमंडळाची कार्ये पुढीलप्रमाणे-
(१) मंत्रिमंडळ कायदयांच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन त्यांचे प्रस्ताव तयार करते.
(२) मंत्रिमंडळ प्रस्तावावर चर्चा करून ते संसदेत मांडण्याचे कार्य करते.
(३) शिक्षण, शेती अशा विविध विषयांवर मंत्रिमंडळ आपले धोरण निश्चित करून ते संसदेत मांडते व
संसदेची त्याला मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न करते.
(४) निश्चित झालेल्या व संसदेने मंजूर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य मंत्रिमंडळ
करीत असते.
(२) संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते?
उत्तर: संसद मंत्रिमंडळावर पुढील मार्गांनी नियंत्रण ठेवते:
(१) मंत्रिमंडळाने संसदेत मांडलेल्या विधेयकांवर संसदेचे सदस्य चर्चा करून विधेयकातील वा धोरणातील
त्रुटी दाखवून देतात. शासनाच्या चुकीच्या धोरणावर टीका करून निषेधही व्यक्त केला जातो.
(२) संसदेच्या अधिवेशन काळात दैनंदिन कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराने होते. संसद सदस्यांनी
विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे संबंधित मंत्र्यांना दयावी लागतात.
(३) अधिवेशन काळातील दररोजचा दुपारी १२ ते ०१ हा काळ 'शून्य प्रहर' म्हणून मानला जातो, या काळात
संसद सदस्य सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करतात.
(४) संसद मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव आणू शकते. ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला
राजीनामा दयावा लागतो.
५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर: