१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन .......येथे होते.
(अ) मुंबई
(ब) नागपूर
(क) पुणे
(ड) औरंगाबाद
उत्तर - नागपूर
(२) राज्यपालांची नियुक्ती. . होते.
(अ) मुख्यमंत्र्यांकडून
(ब) प्रधानमंत्र्यांकडून
(क) राष्ट्रपतींकडून
(ड) सरन्यायाधीशाकडून
उत्तर -राष्ट्रपती
(३) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार......यांना असतो.
(अ) मुख्यमंत्री
(ब) राज्यपाल
(क) राष्ट्रपती
(ड) सभापती
उत्तर -राज्यपाल
२. तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
३. टीपा लिहा.
(१) राज्यपाल
उत्तर :
(१) राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो. राज्याचा कारभार राज्यपालांच्या नावे
चालतो.
(२) त्याची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते व त्यांची मर्जी असेपर्यंत ते अधिकारावर राहू शकतात.
(३) राज्यपाल मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची नेमणूक करतात.
(४) राज्याचा प्रमुख या नात्याने राज्यपालांना काही महत्त्वाचे कायदेविषयक व कार्यकारी अधिकार असतात.
(२) मुख्यमंत्र्यांची कार्ये.
उत्तर:
राज्याचा वास्तविक प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पुढील कार्ये करतो
(१) कार्यक्षम आणि अधिकाधिक प्रातिनिधिक असे मंत्रिमंडळ तयार करणे.
(२) निवडलेल्या मंत्र्यांमध्ये खातेवाटप करणे.
(३) सर्व खात्यांमध्ये समन्वय निर्माण करणे. मंत्रिमंडळातील मतभेद मिटवणे व त्यांच्याकडून प्रभावी कार्य
करवून घेणे.
(४) राज्याचे नेतृत्व करणे, राज्याची धोरणे ठरवून त्याची अंमलबजावणी करणे, जनतेच्या अडचणी, सोडवणे.
समस्या
४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा.
उत्तर : विधानसभेच्या अध्यक्षांची कामे पुढीलप्रमाणे
(१) सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवणे.
(२) विधानसभेच्या अधिवेशनाचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते.
(३) हे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी कार्यक्रमपत्रिका तयार करणे.
(४) सभागृहात असंसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना समज देणे वा त्याचे सदस्यत्व रद्द करणे.
(२) संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली ?
उत्तर : (१) भौगोलिक आकारमान लक्षात घेता भारताचा विस्तार मोठा आहे.
(२) लोकसंख्येच्या दृष्टीनेही भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
(३) भारतात विविध धर्मांचे, संस्कृतींचे, चालीरीतींचे व बहुभाषिक लोक आहेत.
(४) भारतात एकात्म राज्यपद्धती उपयुक्त ठरणार नाही, कारण एकच केंद्रसरकार संपूर्ण देशाचा
राज्यकारभार करू शकणार नाही.
म्हणून संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली.
(३) खातेवाटप करता यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो?
उत्तर: मंत्रिमंडळाची निवड केल्यावर मुख्यमंत्र्यांना खातेवाटप करावे लागते. हे खातेवाटप करताना त्यांना
पुढील विचार करावा लागतो
(१) विविध खात्यांत काही खाती महत्त्वाची असतात, तर काही खाती दुय्यम असतात. त्याप्रमाणे खातेवाटप
करावे लागते. कॅबिनेट व राज्यमंत्री हा मुद्दाही विचारात घ्यावा लागतो.
(२) निवडलेल्या मंत्र्यांच्या कामाचा अनुभव, कार्यक्षमता विचारात घ्यावी लागते.
(३) मंत्र्यांची राजकीय कारकीर्द, त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि त्यांचा कल वा आवड विचारात घ्यावी
लागते.
(४) जनतेच्या समस्यांची जाण, प्रभावी नेतृत्व या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आघाडीचे सरकार असल्यास
खातेवाटप करताना त्या दृष्टीनेही विचार करावा लागतो.
0 Comments