अ. SI पद्धतीत बलाचे एकक ............... हे आहे.
(डाईन, न्यूटन,ज्यूल )
उत्तर: SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन हे आहे.
आ. आपल्या शरीरावर हवेचा दाब ................ दाबा इतका असतो.
(वातावरणीय,समुद्राच्या तळावरील, अंतराळातील)
उत्तर: आपल्या शरीरावर हवेचा दाब वातावरणीय दाबा इतका असतो.
इ. एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या .........द्रवात प्लावक बल ......... असते.
(एकसारखे, घनतेच्या, भिन्न, क्षेत्रफळाच्या )
उत्तर: एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते.
ई. दाबाचे SI पद्धतीतील एकक ...........आहे.
(N/m3, N/m2, kg/m2, Pa/m2)
उत्तर: दाबाचे SI पद्धतीतील एकक N/m2 आहे.
3. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
अ. पाण्याखाली प्लॅस्टिकचा ठोकळा सोडून दिला. तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल? कारण लिहा.
उत्तर:
पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला तर तो पाण्याच्या पृष्ठभागावर येईल.
कारण, प्लास्टिक चा ठोकला पाण्यात सोडून दिला असता, त्यावर प्रयुक्त झालेल्या प्लावक बलाचे परिमाण, प्लास्टिकची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने, ठोकळ्याच्या वजनाच्या परिमाणापेक्षा जास्त असते.
परिणामी ठोकळ्यावरील एकूण बल वरच्या दिशेने असते. त्यामुळे तो ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर येईल.
आ. माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते ?
उत्तर:
1. दिलेल्या बलाने निर्माण होणारा दाब हा बल ज्या पृष्ठभागावर लावले आहे; त्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
2. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जितके जास्त असेल तितका दाब कमी होतो.
3. भार वाहून नेणाऱ्या जड वाहनांना मोठ्या संख्येने चाके असतात ज्यामुळे रस्त्याच्या संपर्कात असलेल्या चाकांच्या भागाचे क्षेत्रफळ वाढते. त्यामुळे दाब कमी होऊन टायर फुटत नाही.
म्हणून माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त असते.
इ. आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो ? तो आपल्याला का जाणवत नाही ?
उत्तर:
1. आपल्या डोक्यावर हवेचा १ Atmosphere इतका हवेचा दाब असतो.
2. आपल्याला दाब जाणवत नाही कारण आपल्या शरीरातील पोकळी हवेने भरलेल्या असतात आणि धमन्या आणि शिरा रक्ताने भरलेल्या असतात. त्यांचा दाब वातावरणामुळे निर्माण झालेल्या दाबाला संतुलित करतो.
त्यामुळे आपल्याला वातावरणाचा दाब जाणवत नाही.
4. असे का घडते ?
अ. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते.
उत्तर:
१) वस्तूवरील प्लावक बाल द्रयुच्या घनतेशी समानुपाती असते.
२) गोड्या पाण्याची घनता ही समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते.
३) परिणामी समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाजावर प्रयुक्त झालेले प्लावक बल कमी असते.
म्हणून, जहाज गोड्या पाण्यात अधिक खोलीपर्यंत बुडते.
आ. धारदार चाकूने फळे सहज कापता येतात.
उत्तर:
१) बल ज्या क्षेत्रफळावर कार्यरत असते, ते क्षेत्रफळ कमी असल्यास बलाचा परिणाम जास्त असतो.क्षेत्रफळ जास्त असल्यास बलाचा परिणाम कमी असतो.
२) धारधार चाकू वापरल्यामुळे प्रयुक्त केलेले बल हे कमी क्षेत्रफळावर कार्य करते.
३) त्यामुळे धारदार चाकूने फळे सहज कापता येतात.
इ. धरणाची भिंत तळाशी रुंद असते.
उत्तर:
१) ज्याप्रमाणे द्रवाची खोली वाढत जाते त्याप्रमाणे द्रवावरील दाब देखील वाढत जातो.
२) त्यामुळे धरणातील पाण्याचा दाब वरच्या भागापेक्षा धरणाच्या तळाशी जास्त असतो.
३) या उच्च दाबाचा सामना करण्यासाठी, धरणाची भिंत वरच्या भागापेक्षा तळाशी मजबूत आणि जाड (रुंद) केली जाते.
ई. थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात.
उत्तर:
१) थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास , त्यातील प्रवासी बसशी निगडीत असल्याने त्यांना बसची गती प्राप्त होते.
२) प्रवाश्यांचा शरीराचा वरचा भाग मात्र जडत्व या गुणधर्मामुले पूर्वीच्याच विराम अवस्थेत राहतो. त्यामुळे, थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात.
5. खालील सारणी पूर्ण करा.
उत्तर:
7. एका वस्तूचे आकारमान 20 cm3 आणि वस्तुमान 50 g आहे. पाण्याची घनता 1 g cm-3 तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल? (उत्तर : बुडेल)
उत्तर:
वस्तूची घनता = वस्तुमान / आकारमान
= 50 / 20
= 2.5 g/cm3
पाण्याची घनता = 1 g/cm3
या ठिकाणी वस्तूची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणून वस्तू पाण्यात बुडेल .
8. एका 500 g वस्तुमानाच्या, प्लॅस्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 cm3 इतके आहे. पाण्याची घनता 1 g cm-3 असेल तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल ? खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल? (उत्तर : बुडेल, 350 g)
उत्तर:
खोक्याची घनता = वस्तुमान / आकारमान
= 500 / 350
= 10 / 7 g/cm3
वस्तूची घनता = 1 g/cm3
पाण्याची घनता = 1 g/cm3
खोक्याची घनता जास्त असल्याने तो बुडेल. खोके स्वतःच्या आकारमानाएवढे पाणी उत्सारेल खोक्याने बाजूला सरलेल्या पाण्याचे वस्तुमान
= खोक्याचे वस्तुमान x पाण्याची घनता
= 350 cm3 x 1g /cm3
= 350 g