(चुंबकत्व, 4.5V, 3.0V, गुरूत्वाकर्षण, विभवांतर, विभव, अधिक, कमी, 0V)
अ. धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते, याचे कारण .....
उत्तर: धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते, याचे कारण गुरूत्वाकर्षण
आ.एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स .......... विभव असलेल्या बिंदूपासून ...... विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात.
उत्तर: एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात.
इ. विद्युतघटाच्या धन अग्र व ॠण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे ....... होय.
उत्तर: विद्युतघटाच्या धन अग्र व ॠण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय.
ई. 1.5 V विभवांतराच्या 3 विद्युतघटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर ...... V इतके असेल.
उत्तर: 1.5 V विभवांतराच्या 3 विद्युतघटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर 4.5V इतके असेल.इ. विद्युतघटाच्या धन अग्र व ॠण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे ....... होय.
उत्तर: विद्युतघटाच्या धन अग्र व ॠण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय.
ई. 1.5 V विभवांतराच्या 3 विद्युतघटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर ...... V इतके असेल.
उत्तर: 1.5 V विभवांतराच्या 3 विद्युतघटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर 4.5V इतके असेल.
उ. एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती ..... निर्माण करते.
उत्तर: एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती चुंबकत्व निर्माण करते.
2) 3 कोरड्या विद्युतघटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे. तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा.
उत्तर:
3. एका विद्युतपरिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरीत दोन समान विभवांतराचे घट बसविले आहेत. जर बल्ब प्रकाशित होत नसेल, तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल ?
उत्तर:
१) तारांचा प्रत्येक जोड नीट जोडला आहे की नाही ते तपासून पाहावे.
२) जोड तारांच्या टोकावरील रोधित आवरण पूर्णपणे काढले आहे की नाही ते पाहावे.
३) एका विद्युत घटाच्या धन टोकाला दुसऱ्या विद्युत घटाचे ऋण टोक जोडले गेले आहे की नाही ते तपासून पाहावे.
विद्युत घटाच्या बाहेरील आवरणाच्या आतमध्ये एक पांढरट धातूचे आवरण असते हे आवरण जस्त (Zn) या धातूचे आवरण असते . हे आवरण विद्युत घटाचे ऋण टोक म्हणून कार्य करते. जस्ताच्या आवरणाच्या आतमध्ये आणखी एक आवरण असते. या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी (Electrolyte) भरलेली असते. विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित व ॠणप्रभारित आयन असतात. त्यांच्यामार्फत विद्युतवहन होते. ही अपघटनी म्हणजे ZnCl 2 (झिंक क्लोराईड) आणि NH 4 Cl (अमोनिअम क्लोराईड) यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. घटाच्या मध्यभागी एक ग्राफाइट कांडी असते. हे घटाचे धन टोक असते. कांडीच्या बाहेरील भागात MnO 2 (मँगनीज डायॉक्साइड) ची पेस्ट भरलेली असते. या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकांवर (graphite rod, zinc) विद्युतप्रभार तयार होतो व परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो.
कोरडे विद्युतघट वापरायला सोयीचे असतात. कारण ते उभे, आडवे, तिरपे कसेही ठेवता येतात. रेडीओ संच, भिंतीवरील घड्याळ, विजेरी, खेळणी, रिमोट कंट्रोल यासारख्या चल साधनांमध्ये सहजपणे वापरता येतात.
तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युतचुंबक म्हणून कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युतचुंबकाजवळ बसवलेली असते. ह्या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो.
ह्या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो. परीपाथातील काळ वापरून परिपथ पूर्ण केल्यावर, स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युतचुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो. मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युतप्रवाह खंडित होतो. अशा स्थितीत विद्युतचुंबकाचे चुंबकत्व नाहिसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटते. त्यामुळे लगेच पुन्हा विद्युतप्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि घंटा खणाणते.
कळ वापरून परिपथातील विद्युत प्रवाह बंद केल्यावर घंटेचा खणखणाट थांबतो.
0 Comments