2 . आरोग्य व रोग





2. वेगळा शब्‍द ओळखा.
अ. हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्‍यू

उत्तर: कावीळ

 

आ . प्‍लेग, एड्स, कॉलरा, क्षय

उत्तर: एड्स,

3. एक ते दोन वाक्यांत उत्तरे द्या.

अ. संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते?
उत्तर:

          दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक (कीटक व प्राणी) इ. संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यमे आहेत.तसेच रोग्याच्या वस्तू वापरल्याने आणि रोग्याच्या जास्त काळ सहवासात राहिल्याने संसर्गजन्य रोग पसरतात.

 

आ. असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हांला सांगता येतील ?
उत्तर:

          मोतीबिंदू, अस्थमा, दीर्घ फुफ्फुस रोग, दीर्घ वृक्क रोग, धमणी , तीव्र श्वसन रोग, सिरोसीस, अल्झायमर.

 

इ. मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती ?
उत्तर:

मधुमेहाची मुख्य कारणे:

अनुवंशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा/कष्टाचा अभाव, मानसिक ताण.

हृदयविकाराची मुख्य कारणे:

धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता.

 

4. तर काय साध्य होईल /तर काय टाळता येईल /तर कोणत्या रोगांना आळा बसेल?

अ. पाणी उकळून व गाळून पिणे.
उत्तर:

१) काय साध्य होईल: पाणी निर्जंतुक होईल .

२) काय टाळता येईल: संसर्गजन्य रोग.

३) कोणत्या रोगांना आळा बसेल : अतिसार, कावीळ, विषमज्वर, पटकी.

 

आ. धूम्रपान, मद्यपान न करणे.
उत्तर:

१) काय साध्य होईल: शरीरातील फ्फुफुसे, यकृत स्वस्थ राहतील.

२) काय टाळता येईल: असंसर्गजन्य रोग.

३) कोणत्या रोगांना आळा बसेल : कर्करोग, हृदयविकार.

 

इ. नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे.
उत्तर:

१) काय साध्य होईल: शरीर निरोगी राहील, वजन संतुलित राहील.

२) काय टाळता येईल: ताणतणाव, स्थूलत्व, राग.

३) कोणत्या रोगांना आळा बसेल : मधुमेह, हृदयविकार.

 

ई. रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली.
उत्तर:

१) काय साध्य होईल: रोगाचे निदान होईल.

२) काय टाळता येईल: रक्तामार्फत पसरणारे रोग.

३) कोणत्या रोगांना आळा बसेल : HIV, डेंग्यू, हत्तीरोग.

5. परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.
 ‘‘गौरव 3 वर्षांचा आहे. तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत (झोपडपट्टीत) राहतात.

सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही.’’

 

अ. वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात ?
उत्तर: वरील परिस्थितीमध्ये गौरवला विषमज्वर , मधुमेह, कर्करोग यांसारखे आजार उद्भवू शकतात.

 

आ. त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल ?
उत्तर: त्याला व त्याच्या पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊ व स्वच्छतेच्या अभावामुळे होणाऱ्या रोगांबाबत अधिक माहिती देऊ. सततच्या मद्यपानाने शरीरावर होणारे दुषपरिणाम समजावून सांगू.

 

इ. गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे ?
उत्तर: गौरवाच्या वडिलांना कर्करोग हा आजार होण्याची शक्यात आहे.

 
6. खालील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा.
 

अ. डेंग्यू

उत्तर:

१) घराच्या परिसरात आजूबाजूला पाणी साचू न देणे.

२) पाणी साठवण्याची भांडी नेहमी झाकून ठेवणे.

३) उद्रेकग्रस्त परिसरात धूर फवारणी करणे.

४) आठवड्यातून एकदा पाणी साठवण्याची भांडी स्वच्छ करून कोरडी करून घ्यावीत.





आ. कर्करोग

उत्तर:

१) आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण मिळते.

२) कर्करोगावर आधुनिक उपचारां-बरोबरच शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो.

३) तंबाखू सेवन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका.

४) तंबाखू, गुटखा, धुम्रपान, मद्यपान करणे टाळणे.

५) आहारात चोथायुक्त पदार्थांचा समावेश करणे.

६) जंकफूड खाण्यावर आळा घालणे.



इ. एड्स

उत्तर:

१) सलूनमध्ये दाढी करताना नवीन ब्लेड वापरले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

२) इंजेक्शन टोचून घेताना नवीन सुईचाच वापर केला आहे की नाही याची दक्षता घ्यावी.

३) रक्त घेण्यापूर्वी ते HIV संक्रमित नसल्याची खात्री करून घ्यावी .

४) लैंगिक शिक्षणाबाबत जागरुकता निर्माण करावी.

7. महत्त्व स्पष्ट करा.

अ. संतुलित आहार
उत्तर:

१) संतुलित आहाराने आपले शरीर पूर्ण क्षमतेने काम करू शकत आणि निरोगी राहते.

२) संतुलित आहारामध्ये विटामिन, खनिजे, प्रथिने यांचे प्रमाण योग्य असल्याने शरीराचे पोषण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.

३) संतुलित आहाराने वजन संतुलित राहून अनेक आजारांना आळा घालता येतो.

४) संतुलित आहाराने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

 

आ. व्यायाम/योगासने
उत्तर:

१) रोज व्यायाम केल्यास शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. 

२) व्यायाम व योगासने केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

३) व्यायामाने मन सकारात्मक बनते तसेच हाडेही मजबूत राहण्यास मदत होते.

४) व्यायाम व योगासंनामुळे वारंवार होणे सर्दी, खोकला, अपचन, रक्तदाब, यांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळते.

५) शरीरातील हाडे मजबूत राहण्यास मदत होते.


 

8. यादी करा.

अ. विषाणूजन्य रोग
उत्तर: अतिसार, कांजिण्या, डांग्या खोकला, डेंग्यू ताप , पोलिओ, देवी, गोवर, एड्स, हिवताप, घटसर्प, चिकनगुनिया, इंफ्युएन्झा, इबोला.



आ. जीवाणूजन्य रोग
उत्तर: विषमज्वर, पटकी, धनुर्वात, क्षयरोग, कृष्ठरोग, न्युमोनिया, प्लेग.

 

इ. कीटकांमार्फत पसरणारे रोग
उत्तर:मलेरिया, डेंग्यू, प्लेग, चिकनगुनिया, हत्तीरोग.



ई. अनुवंशिकतेने येणारे रोग
उत्तर: हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, स्थूलत्व, अनेमिया, फायब्रोसिस.

 
9. कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धती विषयी माहिती लिहा.
उत्तर:

१) कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिशू डायग्नोसिस, सी.टी.स्कॅन, एम. आर.आय.स्कॅन, मॅमोग्राफी बायप्सी, इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो.

२) उपचारांमध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्‍धतींबरोबरच रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कॉपिक सर्जरी अशा उपचार पद्‍धती वापरल्या जातात.

३) चित्र तपासणी: सोनोग्राफी, क्ष-किरण, सीटीस्कॅन, एम.आर. आय, या सारख्या चित्रण तंत्रांच्या सहाय्याने शरीरात नेमकी गाठ कोठे आहे हे कळू शकते.

४) एंडोस्कोपी: च्या सहाय्याने स्वरयंत्र, श्वसननलिका, अन्ननलिका, जठर, मूत्राशय यांसारख्या अवयवांचे निरीक्षण करता येते.शिवज नलिकेतून याचवेळी संशयित गाठीचा नमुना देखील घेता येतो.

५) मॅमोग्राफी : मॅमोग्राफी च्या सहाय्याने स्तनातल्या रक्तवाहिन्यांचे फोटो काढून कर्करोगाच्या गाठीची शक्यता तपासतात.





10. तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्‍यातील घटक लिहा व त्‍यांची यादी करा
उत्तर:

1) Vicks VapoRub : मेन्थॉल, कापूर आणि नीलगिरी तेल.

2) IODEX : लवंग तेल, पुदिना, गंधपुरा .

3) क्रोसिन पेन रिलीफ Tab: पॅरासिटामॉल (650mg) आणि कॅफिन (50mg).

4) moov स्प्रे: पुदिना अर्क, निलगिरी, टर्पेन्टाइन आणि दालचिनी तेल, प्रणोदक आणि सॉल्व्हेंट्स

5) Cipladine Ointment : Povidone Iodine,

Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال