9.नागरी संस्कृती


प्र.१. पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व से संबंधित घटकांपुढे लिहा .

(अ) दगडाची हत्यारे अश्म युग

(आ) ताब्याची हत्यारे च इतर वस्तू ताम्र युग

(इ) लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोह युग

 
 प्र. पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा .

(अ)(१) तांबे (२) सोने (३) लोखंड

उत्तर: १) सोने २) तांबे ३) लोखंड


 (आ) (१) ताम्रयुग (२) लोहयुग (३) अश्मयुग

उत्तर: १ ) अश्मयुग २) ताम्रयुग ३) लोहयुग

 
प्र. ३. पुढील घटनांचे परिणाम लिहा .

(अ) तांबे या धातूचा शोध :

उत्तर: मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले.

(अ) चाकाचा शोध

उत्तर: मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणत तयार करता आली व व्यापार वाढला.


(आ) लिपीचे ज्ञान

उत्तर: व्यापाऱ्याच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली .

 
प्र.४ टिपा लिहा .

(अ)धातूचा वापर

उत्तर: 
        मानवाने हत्यारांसाठी आणि अवजारांसाठी केलेल्या धातूंच्या वापरावरून ख्रिश्चन  ठोमसेन या अभ्यासकाने कालखंडाची  अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी वर्गवारी केली. मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला परंतु सोने निसर्गतः अतिनरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता. त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला. या काळात मानवाने तांबे धातूचा अवजारांसाठी उपयोग मोठ्या प्रमाणवर केल्याने त्या कालखंडाला ताम्रयुग असे म्हणतात. त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने या युगाला लोह्युग असे म्हणतात.

(आ) नागरी समाजव्यवस्था

उत्तर:  व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागैर संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख करणा होते. परंतु नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषिसंस्कृतीवर आधारलेला होता. कृषिसंस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषिसंस्कुतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामुहिक आचार आणी उत्सव यांना अधिक महत्व मिळाले. अनेक नगरमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातांत एकवटले.पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद, ही दोन्ही पडे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती.

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال