10.ऐतिहासिक काळ


प्र.१. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

(अ) नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला ?

उत्तर: नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला.

(अ) हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते?

उत्तर: विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कसे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते.

प्र. २ थोडक्यात उत्तरे लिहा .

(अ) हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती?

उत्तर: हडप्पा संकृतीच्या नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर, काटकोनात छेडणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालये अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था. नगराचे दोन ते चार स्वतंत्र विधाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. या प्रकारची रचना हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना होती.

(आ) नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली ?

उत्तर: 
   नाईल नदीला पावसाळ्यात पूर येतो. हा पूर नदीच्या कथांवर गाळ आणून टाकतो. हजारो वर्षांपासून वाहून आणलेल्या या गाळामुळे नील नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे.

प्र. ३. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर- या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहा.


Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال