5.मानवाची वाटचाल


प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव.

(आ) शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहे मध्ये वस्ती करत होता.

 
प्र. २. प्रत्येकी एक वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) हातकुऱ्हाड कोणी बनवली?

उत्तर: हातकुऱ्हाड शक्तिमान मानवाने बनवली.


(आ)अनुवंशिकता म्हणजे काय?

उत्तर: माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. या बाबींना आनुवांशिकता असे म्हणतात.

 
प्र. ३. पुढील विधानांची कारणे लिहा.

(अ) शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले.

उत्तर:

शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण,

१)शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोप मध्ये बरोबरीने नांदत होते.

२) बुद्धिमान मानवांच्या समूहान्बारोबारचा संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे, अशा काही कारणांमुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले.

(आ) बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.

उत्तर:
बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता कारण,

१)उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते द्वानीच्या बारकाव्यांसह विविध उच्चर करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते.

२) त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच, त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.

प्र.४. पुढील शब्दकोडे सोडवा.

आडवे शब्द

१. ताठ कण्याचा मानव XXXX .

२. ताठ कण्याच्या माणसाला XX निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते.

३. शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले XXXX

७. बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे xx काढू लागला.

९. xxxx म्हणजे बुद्धिमान.

१०. शक्तिमान मानवाने आपली हत्यारे xxx पासून बनवली.

उभे शब्द

१. कुशल मानव xx.xxxx .

४. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा xxx या देशाच्या परिसरात मिळाला.

५. ताठ कण्याचा मानव xxxxx सारखी हत्यारे बनवत असे.

६. बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये xxxx या नावाने ओळखले जाई.

८. शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून xxx साधत असावा.



Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال