4.उत्क्रांती


प्र.१. रिकाम्या जागी केसातील योग्य पर्याय लिहा.

(अ) उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली .
(चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, लुई लिकी)

(आ) पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय .
(जलचर, उभयचर, सस्तन)


प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

(अ) पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात?

उत्तर: पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना ‘उभयचर’ असे म्हणतात.

 
(आ) आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली?

उत्तर: आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली.

 
प्र. ३. पुढील विधानांची कारणे लिहा .

(अ)डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या.

उत्तर: 

डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या कारण,

१) ज्या प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात, त्या टिकून राहतात.

२) एखादे अचानक आलेले निसर्गातील संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल, हे डायनोसॉरच्या प्रजाती नष्ट होण्याचे कारण आहे.


(आ) मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते.

उत्तर: 

मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते कारण,

१) प्राणिजातीमधील प्राण्यांच्या शरीररचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात.

२) कालांतराने तेच बदल त्या प्राणिजातींच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करतात. त्यामुळे मूळ प्रनिजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक अविन प्रजाती उदयास येते. 

प्र.४. दिलेल्या संकल्पनाचित्रातील रिकाम्या जागा भरा.

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال