५.अन्नपदार्थांची सुरक्षा
प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(किरणीयन, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, नैसर्गिक परिरक्षक, रासायनिक परिरक्षक)
अ. शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला ................... असे म्हणतात.
उत्तर: शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात.
आ. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला ................असे म्हणतात.
उत्तर: दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात.
इ. मीठ हे................ आहे.
उत्तर: मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे.
इ. व्हिनेगर हे ................. आहे.
उत्तर: व्हिनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे.
प्रश्न 2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात?
उत्तर:
1.पाश्चरीकरण पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत उदा., दूध 80० सेल्सिअसला 15 मिनिटे तापवले जाते.
2.नंतर ताबडतोब ते थंड केले जाते.
3.यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते.
अशा प्रकारे दुधाचे पाश्चरीकरण केले जाते.
आ. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत?
उत्तर:
१.भेसळयुक्त अन्नामुळे लहान-मोठे, गरीब[1]श्रीमंत सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो.
२.भेसळीच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते.
३.काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात.
४.कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो.
म्हणून भेसळयुकात अन्नपदार्थ खाऊ नयेत.
इ. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात?
उत्तर:
घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी आईबाबा पुढील काळजी घेतात.
१. अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे.
२.यामुळे विविध पद्धतींमुळे अन्नपदार्थांत होणारी सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही , आणि अन्न सुरक्षित राहते.
ई. अन्नबिघाड कसा होतो? अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते?
उत्तर:
१.शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोचते. जसे, अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे ते खराब होतात.
२.काही अन्नपदार्थ, उदा., दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात.
३.काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात.
४.बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्न बिघडते.
उ. अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल?
उत्तर:
अन्न टिकवण्याच्या पुढील पद्धतींचा वापर आम्ही करू .
१)गोठणीकरण
२)नैसर्गिक परीराक्षकांचा वापर
३.पाश्चरीकरण
५.अन्न हवाबंद डब्यात ठेवणे.
प्रश्न 3. काय करावे बरे?
अ. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.
उत्तर:
१.उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये.
२.उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे आजार होऊ शकतात.
३.अन्नसुरक्षितता आन इ मंकण कायदा २००६ अनुसार अशा दुषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते.
आ. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे.
उत्तर:
१. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत असेल तर त्याला त्याची चूक समजावून सांगावी.
२.अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या आजारांची त्याला माहिती करून द्यावी.
३.अशा अस्वच्छ ठिकाणी आपण पाणीपुरी खाणे टाळावे.
इ. बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत.
उत्तर:
१.बाजारातून भरपूर भाजीपाला आणि फळे विअक्त आणल्यास ती स्वच्छ करून धुवून कोरडी करावीत.
२.रेफ्रिजरेटर मध्ये भाजी ठेवण्याच्या जागी साठवणूक करावी.
३. रेफ्रिजरेटर नसल्यास टोपली किंवा कापाडीत पिशवीमध्ये फळे, भाजीपाला नित झाकून ठेवावा.
ई. उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे.
उत्तर:
१.अन्न पदार्थ नेहमी झाकून ठेवावेत.
२. रेफ्रिजरेटर किंवा फडताळात अन्नपदार्थ ठेवल्यास उंदीर, झुरळ पाल यांच्यापासून अन्नाचे रक्षण होईल.
३. अन्न साठवण्यासाठी उंदीर, झुरळ, पाल फिरकणार नाहीत अशी जागा निवडावी
प्रश्न 4. आमच्यातील वेगळा कोण हे शोधा.
अ. मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडिअम बेन्झोएट.
उत्तर: मीठ
आ. लाखीची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल यलो, हळद पावडर.
उत्तर: हळद पावडर.
इ. केळी, सफरचंद, पेरू, बदाम.
उत्तर: बदाम
ई. साठवणे, गोठवणे, निवळणे, सुकवणे.
उत्तर: साठवणे
प्रश्न 5. खालील तक्ता पूर्ण करा.
क्र.
पदार्थ
भेसळ
1.
हळद पावडर
मेटॅनिल यलो
२.
मिरी
पपईच्या बिया
३.
रवा
लोहकीस
४.
मध
गुळाचे पाणी
प्रश्न 6. असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
अ. गुणात्मक अन्ननासाडी होत आहे.
उत्तर:
कारण
१.अन्नरक्षण करताना अन्नसुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे, अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, यांमुळे अन्नाची गुणात्मक नासाडी होते.
उपाय
२. अन्नाची गुणात्मक नासाडी थांबवण्यासाठी पुढील उपाय करता येतील.
· अन्नरक्षण करताना अन्नसुरक्षेच्या योग्य पद्धतींचा वापर करणे.
· अन्नपदार्थांमध्ये परीराक्षकांचा अतिरेकी वापर टाळणे.
· अन्नपदार्थ अति प्रमाणात शिजवणे टाळणे.
· अन्न तयार झाल्यापासून ते ग्राहकापर्यंत योग्य वेळेत पोहचणे.
आ. शिजवलेला भात कच्चा लागत आहे.
उत्तर:
कारण
१.भात शिजवताना पुरेसे पाणी न टाकल्याने शिजलेले भात कच्चा लागत आहे.
उपाय
२.अश्या भाताला पुन्हा वाफ द्यावी आणि पाणी टाकून पुन्हा भात शिजवावा.
इ. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे.
उत्तर:
कारण
१. अयोग्य साठवण व वितरणाच्या चुकीच्या पद्धतींचा वापर केल्याने तसेच हाताळणी योग्य प्रकारे न झाल्याने बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर असू शकतो.
उपाय
२. गहू कडक उन्हात वाळवावा. गहू पूर्णतः वळवल्यावर तो कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
ई. दह्याची चव आंबट / कडवट लागत आहे.
उत्तर:
कारण
१.दही विरजवताना लावलेले विरजण खराब झाले असेल, तर दही आंबट किंवा कडवट लागते. जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते. दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केले नसेल तरीही दही खराब होते.
उपाय.
१. कडवट दही फेकून द्यावे. आंबट दही ताप करून किंवा साखर घालून वापरावे.
उ. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.
उत्तर:
कारण
कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया झाल्याने फळ काळे पडते.
उपाय:
फळे कापून जास्त काळ ठेवू नयेत.
फळे कापल्या बरोबर लगेच हवाबंद डब्यात झाकून ठेवावी.
फळाच्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर द्यावा त्यामुळे फळ काळे पडण्याचे प्रमाण कमी होते.
प्रश्न 7. कारणे लिहा.
1. 5० सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.
उत्तर:
कमी तापमानाला अन्नपदार्थांतील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात.
म्हणून 5० सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.
2. सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.
उत्तर:
१.पारंपारिक पंगतीच्या पद्धतीमध्ये आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते.
२.बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण ताटात घ्यायचे असते. त्यामुळे अन्नाची नासाडी कमी होते.
३.अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.