६.भौतिक राशींचे मापन
1. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते?
उत्तर:
1.एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात.
2.एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, त्याला वस्तूचे पृथ्वीवरील वजन असे म्हणतात.
3.प्रत्येक ग्रहाचे गुरुत्वीय बल हे वेगवेगळे असते. त्यामुळे एकाच वस्तूचे वजन प्रत्येक ग्रहावर वेगळे भासते.
अ. दैनंदिन जीवनामध्येअचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल?
उत्तर:
1.दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात पुढील काळजी घेवू.
2.वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना त्यानुनासार वेगवेगळी एकके वापरू.
3.आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने शहानिशा करून योग्यरित्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करू.
4.कोणत्याही दुकानातून अथवा भाजी मंडईतून कोणतीही वस्तू विकत घेताना योग्य एकाकांत मोजली जात आहेत की नाही याची खात्री करू, वस्तू मोजण्यासाठी वापरण्यात येणारी साधने प्रमाणित आहेत की नाही याची खात्री करून घेऊ.
आ. वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे?
उत्तर:
वस्तुमान
वजन
पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात.
वस्तुवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात.
वस्तुमान ही अदिश राशी आहे
वजन ही सदिश राशी आहे.
वस्तुमान सर्व परिस्थितीमध्ये समान भरते
वजन नीरनिराळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते.
२. सांगा लावू मी कोणाशी जोडी?
‘अ’ गट
‘ब’ गट (उत्तरे)
1. वेग
इ. मीटर/सेकंद
2. क्षेत्रफळ
उ. चौरस मीटर
3. आकारमान
अ. लीटर
4. वस्तुमान
आ. किलोग्रॅम
5. घनता
ई. किलोग्रॅम / घनमीटर
३. उदाहरणांसहित स्पष्ट करा.
अ. अदिश राशी
उत्तर:
१.केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय.
२.उदाहरणार्थ, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो.
३.उदाहरणार्थ रस्त्याची लांबी दोन किलोमीटर, 101० फॅरनहाइट ताप इत्यादी.
आ. सदिश राशी
उत्तर:
१.परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय.
२.विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत.
३.उदाहरणार्थ, 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस, मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान.
3. मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.
उत्तर:
अ) योग्य साधनांचा वापर न करणे.
१.बाजारात अनेक भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित केलेली वजने वापरत नाहीत. त्याऐवजी दगड किंवा इतर तत्सम साधनांचा वापर करतात. त्यामुळे करत असलेल्या वजनामध्ये बदल होतो.
२.कधी कधी तराजू योग्य प्रकारे कार्य करत नाही.
आ) साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे.
१.दैनंदिन जीवनाम्धेविविध राशींचे मापन करण्यासाठी तराजू, फुटपट्टी, ताणकाटा, दुध मापनाची साधने यांचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही.
२.वजन करताना तराजूच्या कट्यामध्ये फेरफार केला जातो.
4. कारणे लिहा.
अ. शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.
उत्तर:
१. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे ही वेगवेगळी असतात. त्यामध्ये कोणतेही प्रमाणीकरण नसते.
म्हणून शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.
अ. ठरावीक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते.
उत्तर:
१.सतत वापरणे वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यात असते. त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन व मापे यांची तपासणी करणे आवश्यक आहे.
5. अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा.
उत्तर:
१.दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे; अन्यथा त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
२.मापन करायच्या वस्तू मौल्यवान, विशेष महत्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या असतील तर त्यांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे. उदा. सोने, चांदी, इत्यादींच्या वस्तुमानाचे मापन करताना ही दक्षता घेतली पाहिजे.
३.तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापनेही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत.
४.शरीराचे तापमान मोजण्यासाठी डिजिटल स्वरूपातील तापमापक आत्ता उपलब्ध आहे.
५.ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये अत्यंत महत्वाच्या क्रीडास्पर्धांशी निगडीत अंतरे व काल मापन करायला विशेष उपकरणे वापरली जातात.