८. स्थितिक विद्युत
1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
(सदैव प्रतिकर्षण, सदैव आकर्षण, ऋणप्रभाराचे विस्थापन, धनप्रभाराचे विस्थापन, अणू, रेणू, स्टील, तांबे, प्लॅस्टिक, फुगवलेला फुगा, प्रभारित वस्तू,सोने)
अ. सजातीय विद्युत प्रभारांमध्ये............ होते.
उत्तर: सजातीय विद्युत प्रभारांमध्ये सदैव प्रतिकर्षण होते.
आ. एखाद्या वस्तूमध्ये विद्युतप्रभार निर्माण होण्यासाठी .............कारणीभूत असते.
उत्तर: एखाद्या वस्तूमध्ये विद्युतप्रभार निर्माण होण्यासाठी ऋणप्रभाराचे विस्थापन कारणीभूत असते.
इ. तडितरक्षक .........पट्टीपासून बनवला जातो.
उत्तर: तडितरक्षक तांबे पट्टीपासून बनवला जातो.
ई. सहजपणे घर्षणाने ............. विद्युतप्रभारित होत नाही.
उत्तर: सहजपणे घर्षणाने प्लॅस्टिक विद्युतप्रभारित होत नाही.
उ. विजातीय विद्युतप्रभार जवळ आणल्यास ............. होते.
उत्तर: विजातीय विद्युतप्रभार जवळ आणल्यास सदैव आकर्षण होते.
ऊ. विद्युतदर्शीने ............. ओळखता येते.
उत्तर: विद्युतदर्शीने प्रभारित वस्तू. ओळखता येते.
2. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा.
उत्तर:
१.छत्री ही धातूपासून बनलेली असते. छत्रीचा मधला दांडा हा धातूचा असतो आणि त्याचा वरचा भाग हा टोकदार असते. छत्रीसाठी वापरल्या गेलेल्या तारादेखील धातूपासून बनवलेल्या असतात.
२.जोराने विजा चमकत असताना किंवा कडकडत असताना आपण जर छत्री घेऊन बाहेर ग्लेओ तर छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज खेचली जाऊ शकते. आपनी आपले शरीर विद्युतवाहक असल्याने आपल्याला विजेचा जोरदार धक्का बसण्याची शक्यता असते.
३.प्रसंगी मृत्यू ओढवण्याचीही शक्यता असते. असे घडू नये म्हणून मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य नाही.
3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अ. विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल?
उत्तर: विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मी पुढील उपाय योजेन
१)विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहणार नाही.
२)विजा चमकत असताना घराबाहेर पडणार नाही.
३)विजा चमकत असतील तर तडितरक्षक बसवलेल्या घराचा आधार घेईन.
आ. प्रभार कसे निर्माण होतात?
उत्तर:
१.काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त ऋण प्रभारित कणांमुळे ऋणप्रभारित होते.
२.तसेच ज्या वस्तूवरून ऋण प्रभारित कण गेले ती वस्तू ऋण प्रभारित कणांच्या कमतरतेमुळे धनप्रभारित बनते. अर्थात घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूपैकी एक धनप्रभारित तर दुसरी ऋणप्रभारित बनते.
अशा प्रकारे प्रभार निर्माण होतात.
इ. तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते?
उत्तर:
१.ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात, त्याला तडितरक्षक म्हणतात.
२.तडितरक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी. इमारतीच्या सर्वांत उंच भागावर याचे एक टोक असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते.
अशाप्रकारे तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी व्यवस्था केलेली असते.
ई. पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात?
उत्तर:
पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवतात, कारण अशी पहार तडितरक्षकाचे काम करते. त्यामुळे वीज पडल्यास ती चटकन जमिनीमध्ये पसरली जाते. आणि विजेच्या आघातामुळे होणारे मोठ्या प्रमाणवर नुकसान टळते.
उ. पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत?
उत्तर:
जेव्हा ढगांवर फार मोठ्या प्रमाणवर विद्युतप्रभार निर्माण होतो. तेव्हाच विजा चमकण्याची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या दिसत नाहीत.
4. स्थितिक विद्युतप्रभाराची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर:
१.स्थितीक विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात.
२.दोन वस्तू परस्परांवर घासल्या असता त्या वस्तूंवर विद्युतप्रभार निर्माण होतात.
३.ते विजातीय व समान मूल्यांचे आणि थोड्या कालावधी करताच असतात.
४.दोन वस्तूंवरील मिळून निव्वळ विद्युतप्रभार शून्य असतो.
5. वीज पडून काय नुकसान होते? ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल?
उत्तर:
वीज पडल्यामुळे झाडे जाळून जातात, इमारतींवर वीज पडल्याने इमारतींचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होते., जीवितहानी होते, वीज पडल्यास घरातील विजेवर चालणारी उपकरणे निकामी होतात. इत्यादी नुकसान वीज पडल्यामुळे होते.
जनजागृती करताना नागरिकांना पुढील सूचना समजावून सांगता येतील.
१.विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये.
२.विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये.
३.मोठ्या इमारतींवर तसेच घरावर तडितरक्षक बसवून घ्यावा.
४.विजा चमकत असताना धातूच्या खांबाजवळ थांबणे टाळावे.
0 Comments