१० . आपत्ती व्यवस्थापन
पाठाचे नाव : आपत्ती व्यवस्थापन
प्रश्न 1. आमच्यातील वेगळे कोण आहे.
1) दुष्काळ भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात
उत्तर :रेल्वे अपघात
2) अवर्षण, अतिवृष्टी, वादळे, त्सुनामी.
उत्तर :त्सुनामी
3) शिलारस, उष्ण चिखल, राख, टोळधाड.
उत्तर :टोळधाड
4) पिके वाहून जाणे, पिकांवर कीड, ज्वालामुखी, पीक करपणे
उत्तर :ज्वालामुखी
प्रश्न. 2. सांगा पाहू या आपतीवरील उपाय।
1) दुष्काळ
उत्तर :
i) राज्यातील तसेच आपापल्या भागातील विविध प्रकारे वाया जाणाऱ्या पाण्याचा
एकत्रित विचार करण्यासाठी शासनाने राज्य, विभाग व जिल्हापातळीवर आणि लोकांनी आपापल्या स्तरावर समिती गठित करून ठोस नियोजन केल्यास सध्याचा पाणी प्रश्न सहज सुटू शकतो.
ii) पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व पाण्याचा पुनर्वापर करणे.
(iii) मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे, तसेच वृक्षतोड थांबवणे.
(iv) हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे.
2) वीज पडणे
उत्तर :
i) मैदानात, झाडाखाली उभे राहू नये, तसेच उंच ठिकाणी झाडावर चढू नये.
(ii) विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नये.
ii) गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवतीच्या तारेच्या कंपाउंडला टेकू नये.
iv) दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यांवर असाल, तर तात्काळ उतरून सुरक्षित
ठिकाणी जाणे.
(v) एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नये.
(vi) दोन व्यक्तीमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्यावी.
(vii) प्लग जोडलेली विदयुत उपकरणे वापरू नये. मोबाइल कवा दूरध्वनीचा वापर करू नये.
VIlI) पायांखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवावा.
ix) दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसावे.
(x) पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडावे.
xi) पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. घरावर तडित रक्षक बसवून घ्यावे.
3) वादळे
उत्तर :
i) इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटावी त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल.
ii) आपण घराबाहेर असल्यास नेमके कोठे आहोत ते जवळपासच्या नातलगांना, मित्रांना कळवावे.
(iii) तुम्ही स्वतः बाहेर असलात, तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावे.
iv) बॉस रेग्युलेटरचा स्विच बंद करावा. वीजपुरवठा खंडित करावा.
v) तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करावे.
त्यांना सुरक्षित जागी ज्ञाण्याची सूचना द्यावी.
(vi) घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्यावा .
4) ढगफुटी
उत्तर :
i) ढगफुटी अथवा मोठा पाऊस आल्यामुळे दरडी कोसळतात. डोंगर खाली येतो. मोठ्या प्रमाणात दगड-माती खाली येते. तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये.
(ii) प्रचंड पावसामुळे नदीला पूर येतो. तेव्हा नदीकाठच्या हॉटेलात, घरात, मंदिरात,लॉजवर न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी अथवा उंचावर थांबावे.
(ii) पावसामुळे रस्त्याला तडे जातात. पूल वाहून जातात, रस्त्यावर दगड, माती मोठ्याप्रमाणात येते तेव्हा आहे तेथेच थांबून मदतीची वाट पाहावी. वाहन पुढे नेऊ नये,
iv) आपण जिथे थांबलो त्या ठिकाणी रेडिओ टिव्हीवरील बातम्यांकडे लक्ष ठेवून असलेपाहिजे. त्याचबरोबर हवामान खात्याने दिलेल्या सूचना ऐकल्या पाहिजे.
(v) प्रचंड प्रलयामुळे रस्ते वाहतूक कोलमडते, वीज जाते, मोबाईल टॉवर उद्ध्वस्त होतात.
फोन लागत नाही. अशावेळी धीराने संकटाशी सामना करावा. आपत्ती व्यवस्थापनयंत्रणेने उभारलेल्या मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्यावा.
vi) अशा आपतीच्या काळात लुटालुट होण्याची शक्यता असते. अशावेळी मोठ्यासंख्येने एकत्रितपणे व जमावाने राहावे.
vil) औषधे, अन्नाची पाकिटे. पाणी मिळण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या मदत केंद्राच्या संपर्कात राहावे.
vii) आपत्तीप्रवण क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लष्कराचे जवान मदत करीत
असतात. तेव्हा त्यांना सहकार्य करून त्यांची मदत घ्यावी.
(ix) आपत्ती काळात अनेक अडचणी येतात. मदत लवकर पोहचू शकत नाही. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कुणावर दोषारोपण करणे, चुकीचे निष्कर्ष काढणे व अफवा पसरवणे टाळावे.
प्रश्न 3. सत्य की असत्य ते सकारण सांगा.
1) वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते.
उत्तर :
हे विधान असत्य आहे.
कारण i) वादळ ही नैसर्गिक आपती आहे.
ii) वादळाच्या या अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते.
iii) आपण नैसर्गिक आपत्ती टाळू शकत नाही पण त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकतो. अत्याधुनिक यंत्रणा वादळापासून वाचण्यासाठी फायदेशीर ठरतात. म्हणून वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची नसते.
2) आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये,
उत्तर :
हे विधान सत्य आहे.
कारण - पाणी वीज वहन करते. पाण्यात वीज पडून विजेच्या धक्क्याने दुखापत, इजा किंवा मृत्यूपण ओढवू शकतो. म्हणून आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये.
3) ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे.
उत्तर :
हे विधान असत्य आहे.
कारण i) ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे.
ii) पृथ्वींचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे तप्त पदार्थाच्या हालचाली सतत होत असतात. त्यामुळे काहीवेळा भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू
पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात. त्यांना थांबवणे शक्य नाही.
iii) त्याचे भाकीत करणे शक्य आहे. परंतु त्याला नियंत्रित करणे, थांबवणे शक्य नाही. म्हणून ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येत नाही.
4 ) अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो.
उत्तर :
हे विधान सत्य आहे.
कारण - i) अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ पडतो.
ii) पुर यां सारख्या समस्यांना तोंड दयावे लागते. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. जमिनीची धूप होते. पिकांचे अमाप नुकसान होते. आजार, रोगराई यांमुळे लोकांचे आरोग्य खालावते.
iii) जनजीवन विस्कळीत होते. उपासमारीची पाळी येते. म्हणून अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो.
प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
1) त्सुनामी म्हणजे काय ? ती कशी निर्माण होते ?
उत्तर :
i) महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्याया लाटांना त्सुनामी लाटा म्हणतात. त्सुनामी हा जपानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी होय.
(ii) त्सुनामी म्हणजे समुद्रातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते.त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय.त्सुनामीची निर्मिती जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात. महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते, परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधी पेक्षा कमी होतो. पण त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते.
2) ढगफुटी म्हणजे काय ?
एका तासात अचानक किमान एक इंच म्हणजे 25 मिलिमीटर पाणी व गारा असल्यास त्यासह एकंदर 100 मिलिमीटर अथवा अधिक भरेल असा पाऊस म्हणजे ढगफुटी होय.
3) ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा.
उत्तर : ज्वालामुखीचे परिणाम पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहेत.
1) शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते.
ii) ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते.
iii) अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो.
(iv) उष्ण वायूमुळे तापमान वाढते.
v) उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या गाडल्या जातात.
4 ) विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी पुढील उपाय आहेत. -
पाणी वीज वहन करते. पाण्यात वीज पडून विजेच्या धक्क्याने दुखापत, इजा किंवा मृत्यूपण ओढवू शकतो. म्हणून आकाशात वीज कडाडत असताना पाहू नये.
प्रश्न. 5. महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तीवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत ?
उत्तर :
महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत महापूर, दरडी कोसळणे. यावर खालीलप्रमाणे उपाययोजना केलेल्या आहेत.
i) पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या पद्धतीनुसार प्रत्येक विभागांना कामे नेमून दिलेली असतात. त्याप्रमाणे त्यांनी आपापली कामे आपत्तीपूर्व काळात, आपत्तीच्या
काळात आणि आपत्ती नंतरच्या काळात करावयाची असतात. त्यामुळे सर्व विभागात समन्वय राखला जाऊन तात्काल दिलासा मिळतो.
ii) पुराचा धोका असणारी गावे निश्चित करणे, हवामान खात्याशी संपर्क साधून व स्थानिक पोलिस पाटबंधारे विभागाच्या साहाय्याने पूर व अतिवृष्टीची माहिती त्वरित उपलब्ध करून त्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे, आपती संबंधी माहितीचे संकलन व वितरण योग्य प्रकारे होण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
iii) डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे. पाझर तलावाची निर्मिती करणे, नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे. नवीन जंगल लागवड करणे. नद्या जोडणे इत्यादी. उपाययोजना करता येईल.
प्रश्न 6. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल ? का ?
उत्तर -
i) वीज कडाडत असताना प्लग विद्युत संपर्कातून वेगळा असावा, अन्यथा आग लागण्याची संभाव्यता असते.
ii) मोबाईल बंद करून आहे अथवा नाही हे तपासावे. सुरु मोबाईल मधून विद्युत वहन होते व धोका होतो.
iii) आपल्या इमारतीवर तडितरक्षक आहे का हे माहिती करून घेणे, तडितरक्षक ऊर्जा शोषून घेते. इमारतीवर पडून नुकसान करणारी झाडे नियमितपणे छाटावी व नुकसान टाळावे.
0 Comments