३.नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म




 ३.नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म


1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(तापमान, आकारमान, वस्तुमान, घनता, आर्द्रता, आम्लधर्मी, वजन, उदासीन, आकार)


 


अ. हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या ............. प्रमाणे ठरते.


उत्तर: हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता प्रमाणे ठरते.

 


आ. पाण्याला स्वतःचा ............... नाही, परंतु  निश्चित ............. व ............. आहेत.


उत्तर: पाण्याला स्वतःचा आकार नाही, परंतु  निश्चित घनता व वस्तुमान  आहेत.


इ. पाणी गोठताना त्याचे ..................वाढते.


उत्तर: पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते.

 


ई. ................ मृदेचा pH 7 असतो.


उत्तर: उदासिन मृदेचा pH 7 असतो.

 


2. असे का म्हणतात?



अ.    हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रणआहे.

उत्तर: हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत. हे सर्व मिश्रणाच्या स्वरुपात एकत्र असतात. त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे.


 


आ. पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.

उत्तर:


पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले आहे.


 


इ. स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

उत्तर: पाणी हे वैश्विक द्रावक असल्याने त्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात. कपडे धुणे, अंघोळ करणे, भांडी स्वच्छ करणे इत्यादींसाठी स्वच्छक म्हणून वापरले जाते. स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा कोणताही स्वस्त आणि सहज सोपा पर्याय उपलब्ध नाही म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.


3. काय होईल ते सांगा.


 


अ. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले.

उत्तर: हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढते व हवा दमट होते.


 


आ. जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले.

उत्तर:


जमिनीत सातत्याने एकच पिक घेतले तर मृदेची सुपीकता कमी होईल. आणि जमीन पिक घेण्यायोग्य राहणार नाही.




4. सांगा, मी कोणाशी जोडी लावू?

‘अ’ गट


‘ब’ गट (उत्तर)


1. हवा


आ. प्रकाशाचे विकीरण


2. पाणी


अ. उत्सर्जन क्रिया


3. मृदा


इ. आकार्यता


 


5. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.

 


अ. रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते.


उत्तर: बरोबर


 


आ. ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात.


उत्तर: बरोबर


 


इ. हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.


उत्तर: बरोबर


6. खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.


उत्तर:


१)चित्र ‘अ’मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी द्रव स्वरुपात आहे.


२)चित्र ‘आ’ मध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे.  म्हणजेआकृती ‘आ’ मध्ये पाण्याचे तापमान 4 0 C पेक्षा कमी आहे त्यामुळे पाण्याची घनता कमी होते व पाण्याचे आकारमान वाढते.


३)आकृती ‘आ’ मध्ये पाण्याचे तापमान 4 0 C च्या खाली तापमान गेल्याने पाणी प्रसरण पावले आहे . हे बाणांच्या सहाय्याने दर्शविले आहे.


४)पाण्याचे असंगत वर्तन झाल्यामुळे हा छेद रुंदाव्लेला दिसतो.


 


7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.



अ. हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते?

उत्तर:


१)हवा हे काही वायू तसेच धूळ, धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे.


२)जेव्हा प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखूरतात.


३)या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकिरण (Scattering of light) असे म्हणतात.


 


आ. पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा.

उत्तर:


1)    पाणी हे वैश्विक द्रावक आहे. त्यामध्ये विविध पदार्थ विरघळतात.


2)   पाणी रंगहीन, गंधहीन आणि चवहीन आहे.


3)   पाण्याला प्रवाहीता असते.


4)  पाणी हे उत्तम शीतक आहे.


 


इ. समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते?

उत्तर: समुद्राच्या पाण्यात पावसाच्या पाण्याच्या तुलनेत क्षारांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते.




ई. चांगल्या मृदारचनेचे महत्त्व काय आहे?

उत्तर:


मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदारचनेमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात.


1. मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो.


 2. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते


 


उ. मृदेचे विविध उपयोग कोणते?

उत्तर:


मृदेचे उपयोग खालीलप्रमाणे आहेत.


1. वनस्पती संवर्धन: वनस्पतींची वाढ करणे.


2. जलसंधारण: मृदा पाणी धरून ठेवते. यामुळे बंधारे, तळी या माध्यमांतून पाण्याचा आपल्याला बाराही महिने उपयोग करता येतो.


3. आकार्यता:  मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदाहरणार्थ, माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा.


 


ऊ. मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे?

उत्तर:


1)  मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते.


2) मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण मृदापरीक्षणामध्ये तपासले जाते.


3) मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदापरीक्षण उपयुक्त ठरते.


4)              मृदा परीक्षणामुळे मातीचा सामू (PH) समजतो.


 


ए. ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय?

उत्तर:


1)ध्वनी चे प्रसारण होण्यासाठी हवेची मध्यम म्हणून आवश्यकता असते.


२) आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोहोचलेले असतात.


३) हवेचे मध्यम नसेल तर आपल्याला ध्वनी ऐकू येणार नाही म्हणूनच हवा ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्वाची आहे.


 


ऐ. पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये?

उत्तर:


१)पाण्याचा बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसरण पावतो.


२)४० C च्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते.


३) फ्रीझरमध्ये ४० C च्या तापमान खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसारण पावून वाटली फुटू शकते.


पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये.


Post a Comment

0 Comments