11.समोच्च रेषा नकाशा आणि भुरुपे
(१) समोच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो ?
उत्तर - पर्यटक, गिर्यारोहक, नटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक इत्यादींना तसेच कोणत्याही प्रदेशाचे नियोजन करताना या नकाशांचा खूप उपयोग होतो.
(२) समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते ?
उत्तर -
भूपृष्ठावरील विविध भूरूपांचा अभ्यास करताना या भूरूपांची समुद्रसपाटीपासूनची उंची, उंचसखलपणा, उतार, उताराची दिशा, त्यावरील जलप्रवाह यांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी विशिष्ट प्रकारे तयार केलेले नकाशे वापरतात. हे नकाशे म्हणजे समोच्चता दर्शक नकाशे.
(३) शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल ?
उत्तर -
शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग पुढीलप्रमाणे होईल :
१) सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी.
२) मळ्याच्या शेतीसाठी डोंगरउतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी.
३) पावसाचे पाणी उंचावरील प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल व कोणत्या दिशेने संथ गतीने खाली येईल यांविषयीचा अंदाज बांधण्यासाठी इत्यादी.
(४) प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते ?
उत्तर - प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या साहाय्याने दाखवता येते.
२. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार.......असतो.
उत्तर - तीव्र
(२) नकाशावर समोच्च रेषा प्रतिनिधित्व करतात........चे असतो.
उत्तर - समान उंचीच्या ठिकाणांचे
(३).......तील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.
उत्तर - समोच्च रेषांतील
(४) दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे .......तीव्र असतो.
उत्तर - उतार
0 Comments