१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) संसदीय शासन पद्धती ...... येथे विकसित झाली.
(अ) इंग्लंड
(ब) फ्रान्स
(क) अमेरिका
(ड) नेपाळ
उत्तर - इंग्लंड
(२) अध्यक्षीय शासन पद्धतीत - - - हे कार्यकारी प्रमुख असतात.
(अ) प्रधानमंत्री
(ब) लोकसभा अध्यक्ष
(क) राष्ट्राध्यक्ष
(ड) राज्यपाल
उत्तर - राष्ट्राध्यक्ष
२. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा.
उत्तर:
(१) कायदेमंडळ -कायदयांची निर्मिती करणे.
(२) कार्यकारी मंडळ -कायदयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे.राज्यकारभाराविषयीची धोरणे ठरवणे.
(३) न्यायमंडळ - न्यायदान करणे.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.
उत्तर:
(१) संसदीय शासन पद्धती प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली.
(२) इंग्लंडची भारतावर सुमारे १५० वर्षे सत्ता होती. या काळात इंग्रजांनी संसदीय शासनपद्धतीनेच
राज्यकारभार चालवला.
(३) भारतीयांना या काळात या पद्धतीच्या राज्यकारभाराची चांगली ओळख झाली होती.
(४) संविधान सभेतही राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला.
यामुळे भारतीय संविधानकर्त्यांनी भारताला अनुकूल ठरेल
असा बदल करून संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.
(२) संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते.
उत्तर :
(१) संसदीय शासनपद्धतीत संसदेत चर्चा व विचारविनिमय करूनच निर्णय घेतले जातात.
(२) विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देतो.
(३) सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा व विचारविनिमय होऊनच कायदेनिर्मिती होते. एकतंत्रीय राजवटीत
हे होत नसते.
(४) जनतेचे अहित होणारे वा स्वातंत्र्याला बाधित होणारे मुद्दे, धोरणे दूर करण्यासाठी चर्चा व विचारविनिमय
होणे महत्त्वाचे असते.
४. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय?
उत्तरः (१) ज्या शासनपद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदेमंडळाला जबाबदार असते त्या
पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' असे म्हणतात.
(२) या पद्धतीत कायदेमंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो.
(३) प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचे निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. (४)
प्रत्येक खात्याची धोरणे वा निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते.
मंत्रिमंडळाच्या या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच 'जबाबदार शासनपद्धती' असे म्हणतात.
(२) अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर: अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे.
(१) अध्यक्षीय शासनपद्धतीत राष्ट्राध्यक्षाची निवड थेट जनतेकडून होते.
(२) कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. तरीही त्यांच्यात परस्परांवर
नियंत्रण असते.
(३) कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार राष्ट्राध्यक्षाकडे असतात.
(४) कायदेमंडळाच्या पाठिंब्यावर राष्ट्राध्यक्ष अवलंबून नसतो.