8.ऋतुनिर्मिती भाग-२




8.ऋतुनिर्मिती भाग-२

प्रश्न १. अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा. विधाने पूर्ण करा. 

(१) सूर्याचे भासमान भ्रमण होते, म्हणजेच


(अ) सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो.

(आ) सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. 

(इ) पृथ्वी सतत जागा बदलते.


उत्तर - सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो.




(२) पृथ्वीचा आस कललेला नसता, तर.


(अ) पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती. 

(आ) पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती.

(इ) पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.
उत्तर - पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते.

(३) २१ जून व २२ डिसेंबर हे अयनदिन आहेत, कारण

(अ) २१ जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे, तर २२ डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो.

(आ) सूर्याचे दक्षिणायन २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.

(इ) पृथ्वीचे उत्तरायण २१ जून ते २२ डिसेंबर या काळात होते.

उत्तर - २१ जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे, तर २२ डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो.

(४) पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते .......


(अ) उन्हाळा, पावसाळा, परतीचा मॉन्सून, हिवाळा. 

(आ) उन्हाळा, हिवाळा, वसंत ऋतू.

(इ) उन्हाळा, हिवाळा.


उत्तर - उन्हाळा, हिवाळा




प्रश्न २. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.



 (१) उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती कशामुळे होते?

उत्तर -

१) २२ डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो. म्हणजेच या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो. 


२) या दिवशी रात्रमानाचा कालावधी दिनमानापेक्षा जास्त असतो.


२) सूर्यदर्शन काळ, अयनस्थिती, संपातस्थिती यांचा विचार करून आपण हे ऋतू ठरवले आहेत. अशा प्रकारे उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतूची निर्मिती होते.



(२) संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते?

उत्तर -

(१) २१ मार्च व २३ सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. म्हणजे पृथ्वी संपात स्थिती असते . 

२) या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच (१२-१२ तासांचे) असते. या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृतांवर स्थिरावते.



(३) विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही ?

उत्तर -

सूर्यदर्शन काळ, अयनस्थिती, संपातस्थिती यांचा विचार करून आपण हे ऋतू ठरवले आहेत. विषुववृत्तीय प्रदेशात ऋतुबदल जाणवत नाहीत, त्यामुळे तेथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही.



(४) दक्षिणायनात अंटार्क्टिकवृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य २४ तासांपेक्षा अधिक काळ का पाहता येतो ?

उत्तर -

१) पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो, तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धातील २३°३०' अक्षवृत्तांवर सूर्यकिरणे लंबरूप पडतात.

२) कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत सूर्यकिरणे कोणत्याही अक्षवृत्तावर कधीही लंबरूप पडत नाहीत.

म्हणून दक्षिणायनात अंटार्क्टिकवृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य २४ तासांपेक्षा अधिक काळ पाहता येतो 



(५) पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल?

उत्तर -

 पेंग्विन या प्रजातीचे दक्षिण ध्रुवावर वास्तव्य असते.त्यांना तेथील वातावरण अनुकूल आहे त्यांच्या शरीराला त्या वातावरणाची (adaptation) सवय झालेली आहे. 



३. खालील विधानांतील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. 


(१) पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते.

उत्तर - बरोबर


(२) आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.

उत्तर - चूक - आपण उत्तर तसेच दक्षिण यांपैकी कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता, आपणांस सूर्याचे उत्तर गोला भासमान भ्रमण झालेले दिसते.



(३) विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात.

उत्तर - बरोबर 


 (४) उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो. 

उत्तर - चूक - उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो.


(५) दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो.

उत्तर - चूक - दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा ऑस्ट्रेलियातही उन्हाळा असतो.


(६) वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते.

उत्तर - चूक - वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान असते.


प्रश्न ४. खालील आकृतीतील चुका सांगा.

उत्तर -

(१) उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातील अयनस्थिती २२ डिसेंबर रोजी दर्शवली आहे. ती २१ जून ने दर्शवणे आवश्यक आहे.


(२) उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील अयनस्थिती २१ जून रोजी दर्शवली आहे. ती २२ डिसेंबर ने दर्शवणे आवश्यक आहे.


(३) दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयनस्थिती चुकीची दर्शवली आहे ती दक्षिण गोलार्धातील हिवाळ्यातील अयनस्थिती आहे


(४) दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील अयनस्थिती चुकीची दर्शवली आहे. ती दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयनस्थिती आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال