3.संविधानाची वेशिष्ट्ये

 




3.संविधानाची वेशिष्ट्ये




योग्य शब्द लिहा

१. संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा:- संघशासन (केंद्रशासन)

2. निवडणुका घेणारी यंत्रणा :- → निवडणुक आयोग

3. दोन सूचीव्यतिरिक्त असलेली सूची:- समवर्ती सूची



3. लिहिते व्हा.

1. संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंख्य शासनसंस्था असतात ?

देशातील नागरिकांची संख्या मोठी असेल, तर सर्व जनतेला राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही. म्हणून संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंस्था असतात.

2.शेषाधिकार म्हणजे काय ?

सूचीमधील तीन विषयांव्यतिरिक्त उरलेले विषय आणि एखादा नव्याने निर्माण झालेला विषय, यांवर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला असतो, या अधिकारालाच 'शेषाधिकार' असे म्हणतात.

3.संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.

 न्यायालये निरपेक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान् करीत असतात. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये; म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.

प्र 5. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र (EVM) वापरल्यामुळे कोणते फायदे होतात, याची माहिती मिळवा.

छापील मतपत्रिकेत अनेकदा शिक्का मारताना वर खाली असा प्रकार होत असे. मतदान यंत्रात असा प्रकार होत नाही, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे मतदानात कोणताही घोळ होण्याची शक्यता फारच कमी असते.

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال