8.आपली अस्थिसंस्था व त्वचा


प्र.१.रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .

 

अ . ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात , त्याजोडणीला .............. म्हणतात .

उत्तर: ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात , त्याजोडणीला सांधा म्हणतात .
 

आ . बाह्यत्वचेच्या थरांमधील पेशींत................. नावाचे रंगद्रव्य असते .

उत्तर: बाह्यत्वचेच्या थरांमधील पेशींत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते .
 

इ . मानवी त्वचेचे ...................व ..................दोन थर आहेत .

उत्तर: मानवी त्वचेचे बाह्यत्वचा व अंतत्वचा दोन थर आहेत .
 

ई . मानवी अस्थिसंस्था...................भागात विभागली जाते .

उत्तर: मानवी अस्थिसंस्था दोन भागात विभागली जाते .

प्र.२.सांगा मी कोणाशी जोडी लावू ?

 

' अ ' गट

उत्तरे

' ब ' गट

१. उखळीचा सांधा

खांदा

अ . गुडघा

२. बिजागिरीचा सांधा

गुडघा

ब . मनगट

३. सरकता सांधा

मनगट

क . खांदा

  

प्र.३.चूक की बरोबर ते लिहा . जर वाक्य चुकीचे असेल , तर दुरुस्त करून लिहा.

 

अ . हाडांची रचना मऊ / मृदू असते .

उत्तर: चूक

 

ब . मानवी अस्थिसंस्था शरीरातील आंतरेंद्रियांचे रक्षण करते .

उत्तर: बरोबर

 

प्र.४.योग्य त्या ठिकाणी अशी खूण करा .

 

अ . शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे ...
उत्सर्जन संस्था

श्वसन संस्था

अस्थिसंस्था 

रक्ताभिसरण संस्था

उत्तर: अस्थिसंस्था

 

ब . पायांची व हातांची बोटे यांत ........ प्रकारचा सांधा असतो .
 बिजागिरीचा सांधा

उखळीचा सांधा

अचल सांधा

सरकता सांधा

उत्तर: बिजागिरीचा सांधा

 

प्र.५.खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा .

 

अ . तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्ये करते ?
उत्तर: शरीरातील त्वचा पुढील कामे करते:
१) शरीराच्या अंतर्गत भागाचे म्हणजेच स्नायू, हाडे आणि इंद्रिय संस्था यांचे रक्षण करते.
२) शरीरातील आर्द्रता योग्य प्रमाणत ठेवण्याचे काम त्वचा करते.
३) शरीरासाठी आवश्यक असणारे ‘ड’ जीवनसत्वाची निर्मित त्वचेद्वारे केली जाते.
४) शरीरातील विषारी पदार्थ घामा द्वारे शरीराच्या बाहेर काढणे आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवणे .
५) थंडी, उष्णता यांसारख्या बदलांपासून संरक्षण करणे.
६) स्पर्शाचे इंद्रिय म्हणून काम करणे.
 

आ . तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल ?
उत्तर:

१) हाडे मजबूत आणी निरोग राहण्यासाठी शरीराचे पोषण योग्य रीतीने होणे आवश्यक आहे.

२) आहारात दुध मासे अंडी, लोणी यांसारख्या ‘ड’ जीवनसत्व असणार्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने हाडे निरोगी राहतात.

३) हाडे निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्सिअम आणि फॉस्फरस चा पुरवठा करणे .

४) हिरव्या पालेभाज्या, कोवळी पालवी, वनस्पतीजन्य तेल यांचा आहारात समावेश केल्याने हाडे मजबूत राहतात.

 

इ . मानवी अस्थिसंस्थेची कार्ये कोणती ?
उत्तर:

१) शरीराला विशिष्ट आकार हा अस्थिसंस्थेमुळे शरीराला मिळतो.

२) अस्थिसंस्था शरीराला आधार देते.

३) शरीराच्या अंतर्गत भागांचे आणि इंद्रियांचे रक्षण करणे.

४) एक संरक्षक कवच म्हणून कार्य करते.

 

ई . आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा .
उत्तर:

आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे:

१) खेळताना पडल्यास हाड मोडू शकते.

२) अपघात झाल्याने

३) हाडांना योग्य ते पोषण न मिळाल्यास ती कमकुवत होऊन थोडासा ताण पडल्याने हाडे मोडतात.

 

उ . हाडांचे प्रकार किती व कोणते?
उत्तर:

 शरीरातील हाडांचे आकारानुसार चार प्रकार पडतात.

१) चपटी हाडे.

२) लहान हाडे

३) अनियमित हाडे

४) लांब हाडे.

 

प्र.६.काय होईल ते सांगा .

 

अ.जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले , तर ? 
उत्तर: जर आपल्या शरीरातील हाडांचे सांधे नसतील तर

१) शरीराची हालचाल करता येणार नाही.

२) उपांगांच्या हाडांची हालचाल होणार नाही.

 

आ.आपल्या त्वचेमध्ये ' मेलॅनिन ' नावाचे रंगद्रव्यच नसले , तर ?
उत्तर:

१)त्वचेचा रंग हा मेलॅनिन या रंग्द्रव्यावरून ठरतो त्यामुळे मेलॅनिन हे रंगद्रव्य नसेल तर त्वचेला रंग मिळणार नाही.

२) सूर्याच्या अतिनील किरणांपासून शरीराच्या आतील भागांचे संरक्षण होणार नाही.

 

 इ . आपल्या शरीरातील मणक्याच्या ३३ हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते , तर ?
उत्तर:

१)कुलापाच्या आकाराची अनेक हाडे मिळून मणक्याची साखळी तयार होते. यामुळे आपल्याला वाकता येते आपल्या पाठीला लवचिक पणा येतो.

२)जर फक्त एकाच हाड असते तर आपल्याला बसणे, वाकणे, यांसारख्या विविध क्रिया करता आल्या नसत्या.

 

Post a Comment

0 Comments