(अ) कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते-
उत्तर:आई व मुलीचे
(आ) खरा भाग्यवंत-
उत्तर: मराठी भाषेचे अमृत ज्याने प्राशन केले आहे तो.
(अ) विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.
उत्तर: लेऊनिया नाना बोली
माझी मराठी सजली.
(आ) माझ्या मराठीची ओवी दूर देशांतही ऐकायला मिळते.
उत्तर: दूर देशी ऐकू येते
माझ्या मराठीची ओवी
प्र. ३. खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई,
तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.
उत्तर:
माझी भाषा हीच माझी आई आहे. तिच्यामुळेच माझ्या भावनांना अर्थ येतो. तिच्या ऋणात राहावे, तिला कधीच विसरू नये.
प्र. ४. खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्ये तयार करा.
(१) ऋण
उत्तर: वनस्पतींचे ऋण आपण कधीची फेडू शकत नाही.
(२) थोरवी
उत्तर: माझ्या मराठी भाषेची थोरवी महान आहे.
(३) उतराई
उत्तर: आईच्या उपकरातून कोणीही उतराई होऊ शकत नाही.
(४) भाषा
उत्तर: माझी मराठी भाषा हीच माझी आई आहे
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
(१)आई
उत्तर: देई
(२) भिजली
उत्तर: सजली
(३) थोरवी
उत्तर: ओवी
खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्ताने तुमच्या मित्र/मैत्रिणीसाठी
शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा.
गणेश चतुर्थी
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गुढीपाडवा
स्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे, पडता दारी पाऊल गुढीचे!
दिवाळी
नवा दिवस नवा ध्यास, सर्वत्र सुरु झाली दिव्यांची आरास दीपावली निमित्त तुमच्या परिवाराला शुभेच्छा खास.
दसरा
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रमजान ईद
अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा.
नाताळ
आनंद घेऊन नातल आला, निसर्ग हर्ष उल्हासि बहरला सुख-समृद्धी लाभो तुम्हांला, हीच विनंती येशूला.
रंगपंचमी
रले सुरले क्षण जेवढे,आनंदाने जगत जाऊ..
रंगात रंगून होळीच्या, हर्ष उधळत राहू..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!