५ . बाकी वीस रुपयाचं काय ?




प्र. १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.



(अ) साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली?

उत्तर: पाण्याची बाटली आणण्यासाठी साहेबांनी राजूकडे शंभर रुपये दिले होते. तो एकदा गेला तो परत आलाच नाही. राजूने मला ऐंशी रुपयांना फसवले. त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयांना पडली, अशी तक्रार साहेबांनी विकासकडे राजुबाबत केली.



(आ) दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली?

उत्तर: दवाखान्यात राजूच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. त्याला पाहून विकासाची उत्सुत्कता वाढली.



 (इ) दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले?

उत्तर: दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले की, दवाखान्यात पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकून होऊन इथे पैशांसाठी , अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. दुसरीकडे बरेच लॉक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात.



(ई) भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला?

उत्तर: राजूने एक पुठ्ठा घेतला. त्यावर लिहिले-उरलेलं अन्न फेकू नका, मले द्या. मी ते उपाशी लोकायले देतो. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधली आणि गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातील पती वाचून लॉक राहिलेलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. हा उपक्रम राजूने भुकेल्यांसाठी सुरु केला.



(उ) साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला?

उत्तर: राजूने साहेबांचे शंभर रुपये घेतले; पण पाण्याची बाटली काही आणून दिले नाही. म्हणून साहेबांच्या मनात राजूबद्दल गैरसमज निर्माण झाला होता. परंतु राजूच्या मित्राने साहेबाना पाण्याची बाटली तर दिलीच; पण राजूने र्याच्याकडे दिलेली शंभर रुपयाची नोटही दिली. राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला. हे साहेबांना कळले; पण जाताना राजूने प्रामाणिकपणे त्यांचे शंभर रुपये परत केले, हे पाहून साहेबांचा गैरसमज दूर झाला.



प्र. २. तुमच्या मनाने उत्तरे लिहा.



(अ) ‘कोणाच्या वस्तूला हात लावू नको’, असे आईने राजूला का सांगितले असेल?

उत्तर: दवखान्यात आईशेजारी बसून बसून राजूला कंटाळा येत असे. तो दवाखान्यात सर्वत्र फिरत असे, हे आईला ठावूक होते. आपला मुलगा दुसऱ्यांना मदत करतो पण नकळत त्याच्या हातून काही चुकीची गोष्ट घडायला नको; म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नको; असे आईने राजूला सांगितले असावे.



(आ) ‘माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे’, असे साहेब विकासला का म्हणाले असतील?

उत्तर: अगदी छोट्याश्या घटनेवरून, गैरसमज करून घेऊन साहेबांनी राजूला महाबिलंदर असे म्हटले. परंतु विकासाने राजूचे आंतरिक गुण जाणले होते. शेवटी राजूच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय साहेबांना आला व त्यांना स्वतःची चूक समजून आली; म्हणून माणसं ओल्खान्यातला तुमचा अधिकार मोठा आहे, असे साहेब विकासला म्हणाले असतील.



(इ) भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे, म्हणून आणखी काय काय करता येईल?

उत्तर: आपल्या देशाचा विचार केला तर, आपल्या देशात बहुतांश लोक असे आहेत की, त्यांना दोन वेळचे सुद्धा पोटभर जेवायला मिळत नाही आणि दुसरीकडे काही लोक तर अन्न वाया घालवतात. त्यामुळे ज्या लोकांकडे खूप अन्न आहे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या अन्नापैकी थोडे अन्न गरजूंना दान केले तर ही समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदतच होईल. अन्नाची नासाडी करू नये याबाबत जनजागृती करावी.



(ई) तुम्हांला राजूशी मैत्री करायला आवडेल का? का ते सांगा.

उत्तर: मला राजूशी मैत्री करायला नक्कीच आवडेल; कारण

राजू हा प्रामाणिक मुलगा आहे आणि निस्वार्थी स्वभावाचा आहे.
गरजूंना मदत करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो.
तो गरीब असूनदेखील इतरांची सेवा करतो.
एका चांगल्या मित्रामध्ये असणारे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत.


(उ) राहिलेल्या वीस रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हांला वाटते?

उत्तर: विकासाच्या साहेबाबांनी ते वीस रुपये स्वतासाठी खर्च न करता. त्यांना जमेल त्या वेळी त्यांनी समाजातील गरजू लोकांना वीस वीस रुपयांचे वाटप करावे किंवा त्या वीस रुपयांचे अन्न घेऊन एखाद्या गरजूला द्यावे.



(ऊ) राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगांतून दिसून येतो?

उत्तर: 

१) राजू दवाखान्यात आईसोबत तिची सेवा करण्यासाठी थांबला.

२) राजू विकासला रोज पाण्याची बाटली पोहचवत असे

३) दवाखान्यात गरजू लोकांना अन्न देण्यासाठी त्याने एक मोहीम सुरु केली होती.

४) साहेबांचे शंभर रुपये आणि पाण्याची बाटली राजूने मित्राकरवी साहेबांना परत पाठवली.

 

प्र. ३. तुम्हांला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल ते लिहा.

उत्तर: 

१) तुमचा मुलगा राजू खूप प्रामाणिक आणि गुणी आहे.

२) त्याने प्रामाणिक पणाने साहेबांचे शंभर रुपये परत केले.

३) दवाखान्यातील लोकांना अन्न मिळावे म्हणून त्याने मोहीम सुरु करून त्यांना अन्न मिळवून देण्याचे महान कार्य केले.

४) मला राजूचा खूपच अभिमान वाटतो.



प्र. ४. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशाप्रकारे मदत कराल?

उत्तर: एखाद्या गरजूला मदत करण्यासाठी मी आई बाबा मला खाउसाठी देत असलेल्या पैशांमधील काही पैसे बाजूंला साठवून. शाळेतील गरजू मुलाला छोट्या छोट्या शाळेसाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू विकत घेऊन देणे.

गरजू विद्यार्थ्याची परिस्थिती शिक्षकांना सांगून शालेय पातळीवरून काही मदत करण्यास सांगणे.

मित्र मैत्रिणींना त्या गरजू मुलाला जमेल तशी मदत करायला सांगणे.

 

प्र. ५. पाठात तुम्हांला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटींत लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी आठ-दहा ओळींत माहिती लिहा.

उत्तर: राजुमधील गुण

प्रामाणिक 

मदतीला तत्पर  

निस्वार्थी

परोपकारी

बुद्धिमान

सचोटीने वागणारा



राजू- 

                राजू हा इयत्ता पाचवीमध्ये शिकणारा एक प्रामाणिक मुलगा आहे. राजू हा गरजूंच्या मदतीला धावून जाण्यासाठी नेहमी तत्पर असतो. राजू हा निस्वार्थी आहे दुसऱ्यांना मदत करीत असताना तो त्यात स्वतःचा स्वार्थ पाहत नाही. राजू हा बुद्धिमान मुलगा आहे. त्याने त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच गरजूंना अन्न मिळवून देण्यासाठी मोहीम सुरु केली. राजू हा परोपकारी मुलगा आहे. साहेबांचा गैरसमज दूर करणारा त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे, त्यावरून तो सचोटीने वागतो हे सिद्ध होते.

खेळूया शब्दांशी.



(अ) फसवाफसवी, कचराकुंडी, गोरगरीब यांसारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा.

उत्तर: केरकचरा, कामधंदा, ताटवाटी, तांब्यापेला.



(आ) खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा.

उतर:

(अ) फाईल = नस्ती

(आ) सेंटर = केंद्र

(इ) पेशंट = रुग्ण

(ई) विंग = विभाग

(उ) हॉटेल = उपहारगृह

(ऊ) कॅन्सर = कर्करोग

 

(इ) पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.

(अ) महाबिलंदर

वाक्य: लोकांना पैशाच्या बाबतीत फसवणारा रामलाल एक महाबिलंदर माणूस आहे.

(आ)अनुभवशून्य

वाक्य: शेतीच्या बाबतीत आत्ताची पिढी अनुभवशून्य आहे.



(इ)आवाहन

उत्तर: पुरामध्ये नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने नागरिकांना आवाहन केले.



(ई) निरुत्तर

वाक्य: राजूचा प्रामाणिकपणा पाहून साहेब निरुत्तर झाले.

 

(ई)‘भारी कौतुक’ म्हणजे ‘खूप कौतुक.’ ‘भारी’ हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता? हा शब्दवापरून तीन-चार वाक्ये लिहा.

उत्तर: 

        एखाद्याने चांगले काम केल्यावर किंवा अवघड काम केल्यावर त्याचे कौतुक करताना भारी हा शब्द उच्चारतो.

1. आमच्या गावातील रामू खूप मस्ती करतो पण तो एकदम भारी चित्र काढतो.
2. सदूने पुरात अडकलेल्या मुलाला वाचवून एकदम भारी काम केले.
3. राणी एकदम भारी जेवण बनवते.
4. निखील व्यवसायातील निर्णय अगदी भारी घेतो.
 

‘पैसा’ या शब्दाचे सामान्यरूप समजून घ्या. उदा. पैसा-पैशाला, पैशाने, पैशांसाठी, पैशांचा, पैशांहून, पैशातला. याप्रमाणे खालील शब्दांची सामान्यरूपे लिहा.

(अ) मासा - माशाने, माशाला, माशाहून, माशांचा, माशांसाठी

(आ) ससा - सशाने, सशाला, साशाहून, सशांचा, सशांसाठी.

(इ) ठसा – ठशाने, ठशाला, ठशाहून, ठशांचा, ठशांसाठी.

 

खालील शब्दांना की, ई, ता, वा, पणा, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा.

(अ) सुंदर = सुंदरता

(इ) नवल = नवलाई

(उ) दांडगा = दांडगाई

(ए) पाटील = पाटीलकी

(आ) प्रामाणिक = प्रामाणिकपणा

(ई) गोड = गोडवा

(ऊ) शांत = शांतपणा

(ऐ) चपळ = चपळाई

 

खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) मित्रत्व x शत्रुत्व

(आ) गरिबी x श्रीमंती

(इ) खरेपणा x खोटेपणा

(ई) महागाई x स्वस्ताई

 

खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा.

(अ) मनुष्यत्व – मित्रत्व, शत्रुत्व.

(आ) आपुलकी – माणुसकी.

(इ) नम्रता – अक्षता.

(ई) नवलाई – पावणाई.

(उ) बालपण – मोठेपण, थोरपण.

(ऊ) माधुर्य – चातुर्य.

ओळखा पाहू!



१. मागे आणि पुढे दोन तोंडे असतात मला,

जमीन भुसभुशीत करण्याची माझी कला,

शेतकऱ्या चा मित्र म्हणून ओळखतात मला.

ओळखा कोण?

उत्तर: गांडूळ

 

२.पहाट होताच तुम्हांला दिसतो,

तेव्हा च दिवस सुरू होतो,

लवकर उठून पाहायचा,

तुम्ही निश्चय करा,

आहे सर्वांत मी, तेजस्वी तारा.

ओळखा कोण?

उत्तर: सूर्य


Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال