२१.समुहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था


माहित आहे का तुम्हाला? 

प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्रात २१६३६ ग्रामपंचायती होत्या. ती संख्या २०१० अखेर २७९९३ इतकी झाली. ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या ५०० इतकी आवश्यक आहे. ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या दोन- तीन गावांची मिळून गट ग्रामपंचायत बनते. 

स्वाध्याय

१) सार्वजनिक सुविधा म्हणजे काय? 

उत्तर- सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोई. वाहतूक, शाळा, दवाखाने यासारख्या अनेक सुविधांना सार्वजनिक सुविधा म्हणतात. 

२) सार्वजनिक जीवनात आपण कोणत्या सुविधांचा वापर करतो? 

उत्तर- सार्वजनिक जीवनात आपण वाहतूक, शाळा, दवाखाने या सारख्या सेवा सुविधांचा वापर करतो. 

३) स्थानिक शासन कोणत्या सेवा पुरवते? 

उत्तर- स्थानिक शासन पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, दवाखाने, शाळा, रस्ते यासारख्या सुविधा पुरवते. 

४) आपल्या गावाचा कारभार कोण बघते?

उत्तर- आपल्या गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते. 

५) नगराचा कारभार कोण पाहते? 

उत्तर- नगराचा कारभार नगरपालिका पाहते. 

६) मोठ्या शहरांसाठी कारभार पाहण्यासाठी कोणती सुविधा उपलब्ध असते? 

उत्तर- मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते. 

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال