1.चार ते पाच वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा .
(अ) कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे ?
उत्तर -चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी आई रानात जायची.
तिच्या पायांत साध्या चपलाही नसायच्या. रानभर अनवाणी
कष्ट करत वणवण फिरायची. विंचू चावेल किंवा काटेकुटे
बोचतील याची आईला पर्वा नसायची.
(आ) कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे ?
उत्तर -कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याला उसनेपासने
आणून खायला घालते. त्याच्यासाठी नाना तऱ्हेचे पदार्थ
आणते. आई कवीला म्हणते घाई करु नको. पोटभर खा.
(ई) आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा,असे कवीला का वाटते ?
उत्तर -कवीने खूप शिकावे, असे आईला वाटते. त्यासाठी ती अपार
कष्ट करते. वडिलांना विरोध करते. सूनमुख पाहण्यासाठी ती
अधीर आहे. म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा या
प्रेमळ आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला वाटते.
(इ) कवीच्या आईचे डोळे का भरून येतात ?
उत्तर -कवीचे शिक्षण आता बस झाले, असे कवीचे वडील
आईला सांगतात. त्याने शेतावर काम करावे, अशी त्यांची
इच्छा असते. आईला मात्र मुलाला खूप शिकवायचे असते.
त्यामुळे आईला वडिलांचे बोलणे आवडत नाही; म्हणून
आईचे डोळे भरून येतात.
(उ) आईसाठी कवीला काय करावेसे वाटते ?
उत्तर -अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी, असे
कवीला वाटते. जी जन्मभर आपल्यासाठी झिजली; त्या
माऊलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात. तिला
सुखीसमाधानी जीवन द्यावे. अशा या आईच्या पायाशी
नम्र होऊन तिला वंदन करावे, असे कवीला वाटते.
प्र. २. कोण, कोणास व का म्हणाले?
(अ) करू नको घाई म्हणे पोटभर खाय.
उत्तर: असे कवीची आई कवीला म्हणायची.
कारण, कवी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहत असल्याने त्या ठिकाणी त्याची जेवणाची आबाळ होत असणार हे आईला ठावूक होते म्हणून ती कवीला सावकाश आणि पोटभर जेवायला सांगते.
(आ) बस झालं शिक्शन याचं घेऊ दे हाती रूमनं.
उत्तर: असे कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले.
कारण, आपल्या मुलाने शेतीमध्ये आपला हातभार लावावा असे त्यांना वाटायचे. म्हणून ते असे आईला म्हणाले.
(इ) या डोयानं पाहीन रे मी दुधावरची साय.
उत्तर: असे आई कवीला म्हणाली.
कारण, कष्ट करणाऱ्या कवीच्या आईच्या मनात कवीने लग्न करून संसार करून दुधावरच्या सायीसारखी नातवंडे पहावी अशी इच्छा आहे. म्हणून ती कवीला असे म्हणाली.
(इ) अन् ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय.
उत्तर: असे कवी आईला म्हणाला.
कारण, अपार मेहनत करणाऱ्या आईचे ऋण फेडण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाला.
प्र. ३. कविता वाचताना तुम्हांला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा.
उत्तर:
१) आई रानात अनवाणी फिरून लाकडे गोळा करते, तिला पायात काटे टोचण्याची तसेच विंचवाच्या दंशाची पर्वा नाही.
२) कवीच्या वडिलांचा कवीच्या शिक्षणासाठी असणारा विरोध सहन करून देखील कवीची आई कवीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हे कवितेतील प्रसंग मला अस्वस्थ करतात.
प्र. ४. या कवितेचे स्वतःच्या शब्दांत रूपांतर करून कथा लिहा. तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या.
उत्तर: आई थोर तुझे उपकार
गाय हंबरून जेव्हा आपल्याला वासराला चाटत असते तेव्हा त्या गायीच्या मायेमध्ये मला माझ्या आईची माया दिसते. लाकडे गोळा करण्यासाठी माझी आई रानात जाते तीही अनवाणी पायाने तिच्या पायात साधी चप्पल सुद्धा नाही तिचे पाय विंचवाच्या दंशाला वा रानातील काट्यांना घाबरत नाहीत. सुट्टीच्या दिवसांत मी जेव्हा घरी येतो तेव्हा घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आई दुसऱ्यांकडून उसने पासने आणून मला विविधप्रकारचे जेवण बनवून खाऊ घालते. ते जेवण मी पोटभर खावे म्हणून ती सावकाश जेवायला सांगते. आत्ता शिक्षण बस झालं . शिक्षण बसं झालं शिकून कुठे मी मोठा साहेब होणार आहे. आत्ता मी शेतीसाठी मदत केली पाहिजे असे ते आईला सारखे बोलत असतात. हे सर्व वडिलांचे बोलणे ऐकून आई अस्वस्थ होते आणि तिच्या डोळ्यांत आपसूकच पाणी येते. असच बोलता बोलता तिच्या डोळ्यांत पाणी आले. ती माझ्याशी बोलताना मला म्हणते तुझी राणी कधी येणार म्हणजे तुझे लग्न कधी होणार मला माझ्या नातवंडांना माझ्या डोळ्यांनी पाहायचे आहे. आई मला तुला खूप सुखाने ठेवायच आहे. आई तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेऊन तुझे पाय घट्ट धरून ठेवायचे आहेत.
प्र. ५. ‘माझी आई’ या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा.
उत्तर: माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. पण शिस्तीच्या बाबतीतही ती तेवढीच कडक आहे. नेहमीच तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते. माझी आई मनमिळाऊ आणि दयाळू आहे. ती घरमाधे आलेल्या नातेवाईकांचे तसेच पाहुण्यांचे खूप आनंदाने स्वागत करते.माझ्या मित्राना आणि बहिणीच्या मैत्रिणींना ती खूप प्रेम करते.
माझी आई धार्मिक विचारांची आहे. आमच्या घराशेजारी असणाऱ्या मंदिरात ती पूजेसाठी जाते. आमच्या घरामध्ये सुद्धा एक छोटं मंदिर आहे. ती रोज सकाळी आणि सायंकाळी या मंदिरामध्ये दिवा लावते सायंकाळी देवासमोर हात जोडूनि शुभंकरोती म्हणायचे तिनेच तर आम्हाला लहानपणापासून शिकविले. माझ्यासाठी माझी आईच सर्वकाही आहे . माझी पहिली गुरु तीच आहे अशा माझ्या प्रेमळ आईला कोटी कोटी प्रणाम.
प्र. ६. खालील शब्द पाहा.
वहाण-चपला, वाहन-प्रवासाचे साधन.
उच्चारात बरेच साम्य असलेले; पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या. लिहा. त्यांचे अर्थ समजून घ्या.
उत्तर: उश्या: झोपताना डोक्याखाली घ्यायची गादी ; उषा: सकाळ
दिन: दिवस ; दीन: गरीब
खेळूया शब्दांशी.
(अ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
१)माय : जननी, आई, माता.
२) डोया: डोळा, नयन, नेत्र.
३)इचू: विंचू
४)वहाण: चप्पल.
(आ) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
१)घाई ✖ सावकाश, निवांत.
२) अनेकदा ✖ एकदा.
३) सुख ✖ दुखः
४) पोटभर ✖ उपाशी
(इ) गळ्याची आण घालणे, कान भरणे हे वाक्प्रचार या कवितेत आलेले आहेत. गळा व कान या अवयवांवरील वाक्प्रचार माहित करून घ्या व त्यांची यादी करा.
उत्तर:
कान:
१)कान भरणे
२) कानी पडणे
३) कानाला खडा लावणे
४) कान उघडणी करणे
५)कानमंत्र देणे.
गळा :
१)गळा दाटून येणे.
२) गळ्यात पडणे.
खालील वाक्यांतील सर्वनामांना अधोरेखित करा.
१. राधा म्हणाली,‘प्रशांत, तू किती छान गाणे गातोस.’
२. ती माझी बहीण आहे.
३. कोणी कोणाशी भांडू नये.
४. ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे, त्याला मी घेऊन जाईन.
५. मला कोणी काही विचारू नये.
६. सदा माधवच्या बाबांना म्हणाला, ‘हा मला त्रास देतो, त्याला मी समजावून सांगितले; पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो.’
गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा.
१. ह्या वह्या मुलांना द्या. (हा, ही, ह्या)
२. त्याला काय आवडते? (काय, कोणते, कोणी)
३. आम्ही आकाशकंदील बनवले.(तू, आम्ही, स्वत:)
४. मी स्वत: स्वयंपाकघर स्वच्छ केले. (आपण, स्वत:, त्याने)
५. त्याने कोणाला काही सांगितले नाही. (कोणाला, कोणी, काय)
खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा.
१. मी आज पतंग उडवणार आहे.
२. ती पतंग छान उडवते.
३. मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो.
४. आपण पतंग उडवूया.
५. पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत.
· खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्ये लिहा.
१. कोण – सहलीला कोण जाणार आहे?
२. हे – हे पुस्तक आहे.
३. ती – ती सहलीला जाते.
४. काय – तुला काय पाहिजे?
५. कोणाचा – वर्गात कोणाचा पहिला नंबर आला.
६. ही - ही वही आहे.
0 Comments