6.नैसर्गिक प्रदेश




6.नैसर्गिक प्रदेश

प्रश्न१.खालील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.


(१) पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात.

उत्तर: चूक (पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात.


(२)  प्रेअरी प्रदेशाला ‘जगातील गव्हाचे कोठार’ असे म्हणतात.
उत्तर: बरोबर

(३) भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते.

उत्तर: चूक (भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.)



(४) उष्ण वाळवंटी प्रदेशात ‘उंट’हा महत्त्वाचा प्राणी  आहे, कारण तो अन्नपाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो, तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे.
उत्तर: बरोबर



(५) वाघ, सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशांत जास्त आढळतात.

उत्तर: चूक. ( वाघ, सिंहासारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात.)

प्रश्न २.भौगोलिक कारणे द्या.


(१)  मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.
उत्तर:

१)मोसमी प्रदेशातील  उन्हाळ्यातील तापमान २७० से. ते ३२० से. इतके असते.

तर  हिवाळ्यातील तापमान १५० से. ते२४० से. इतके असते.

२)मोसमी प्रदेशात पाऊस २५० ते २५०० मिमी इतका होतो.

३)नैऋत्य  मान्सून वाऱ्यांपासून ठरावीक ऋतूंत पाऊस पडतो

४)मोसमी प्रदेशातील पावसाची स्थिती आणि तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.

त्यामुळे मोसमी प्रदेशांमध्ये शेती हा व्यवसाय प्रामुख्याने करतात.



(२)विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात.
उत्तर:

1) विषुववृत्तीय प्रदेशात वार्षिक तापमान हे सरासरी तापमान २७० से. असते. उन्हाळी दिवसांतील सरासरी तापमान हे सुमारे ३००  से इतके असते.

2)   विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी २५०० ते३००० मिमी पाऊस पडतो.

3)   या भागामध्ये सूर्यकिरणे लंबरूप पडतात. ‘

4)  परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी विषुववृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात



(२)  टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारेअसते.      
उत्तर:

१)टुंड्रा प्रदेशात उन्हाळ्यात सरासरी १०० से. तापमानअसते. तर हिवाळ्यातील तापमान सुमारे -२० ०  ते -३० ०  इतके असते. हे तापमान वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक नसते.

२) या ठिकाणी छोटी झुडपे, गवत यांसारख्या वनस्पती वाढतात. परंतु हिवाळ्यातील अतिशय थंड हवामानामुळे या वनस्पती देखील नष्ट होतात. त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते.

प्रश्न ३. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.


(१)  तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहे?
उत्तर: सुमारे ५५० उत्तर ते ६५० उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान तैगा प्रदेशाचा विस्तार आहे.



(२)  सुदान प्रदेशातील कोणतेही तीन तृणभक्षक प्राणी  सांगा. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे?
उत्तर:

१)सुदान प्रदेशमध्ये कांगारू,झेब्रा , जिराफ हे तृणभक्षक प्राणी सुदान प्रदेशमध्ये आढळतात.

२)सुदान प्रदेशातील या प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. त्यामुळे मांसभक्षक प्राण्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी स्वसंरक्षणासाठी त्यांना वेगाने पळणे शक्य होते. आणि आपल्या जीवाचे रक्षण करणे शक्य होते.



(३)  मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर:

मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिट्य पुढील प्रमाणे आहेत.

१)हवामान : उन्हाळ्यातील तापमान २७० से. ते ३२० से. हिवाळ्यातील तापमान १५० से. ते२४० से. पाऊस २५० ते २५०० मिमी होतो. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठरावीक ऋतूंत पाऊस पडतो. पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते.

२)नैसर्गिक वनस्पती: पानझडी व निमसदाहरित वने.

३)प्राणी जीवन:  वाघ, सिंह, बिबट्या,हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप, मोर, कोकीळ इत्यादी वन्य प्राणी व पक्षी. गाई, म्हशी, शेळ्या, घोडे हेपाळीव प्राणी.

४)मानवी जीवन: लहान-लहान असंख्य खेडी आहेत. अन्न व पोशाखात बरीच विविधता. लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात आढळते. शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.

Post a Comment

0 Comments