2.सूर्य ,चंद्र व पृथ्वी




2.सूर्य ,चंद्र व पृथ्वी

स्वाध्याय

 

प्रश्न १. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.


१) चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.

उत्तर: चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.



(२) पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.

उत्तर: पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो.



(३) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे.

उत्तर: पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही.

(४) चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.

उत्तर: चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेडते.



(५) सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.

उत्तर: सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही. सूर्यग्रहण पाण्यासाठी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारच्या चाष्म्यांचा वापर करावा.



(६) चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.

उत्तर: चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.

प्रश्न २. योग्य पर्याय निवडा.
(१) सूर्य ग्रहण

उत्तर: आ

 

(२) कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब

उत्तर: आ 

 

(३) चंद्राची उपभू स्थिती :

उत्तर: इ

प्रश्न ३. पुढील तक्ता पूर्ण करा.
तपशील/वैशिष्ट्ये

चंद्रग्रहण

सूर्यग्रहण

तिथी दिवस

पौर्णिमा

अमावास्या

स्थिती

चंद्र-पृथ्वी-सूर्य

पृथ्वी-चंद्र-सूर्य

ग्रहणांचे प्रकार

खग्रास व खंडग्रास

खग्रास व खंडग्रास व कंकणाकृती

खग्रासचा जास्तीत

जास्त कालावधी

१०७ मिनिटे

७ मिनिटे २० सेकंद


प्रश्न ४. आकृती काढा व नावे लिहा.



प्रश्न ५. उत्तरे लिहा.

(१) दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत?
उत्तर:

१)पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात.

२)चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५० चा कोन करते.

म्हणून दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत.



(२) खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते?
उत्तर:

१) सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीमध्ये हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत आली, की चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते.

२) एकाच वेळी चंद्राची पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते त्या ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण अनुभवता येते.

३) पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची विरळ सावली असते त्या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते.

यामुळे खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवास येते.

(३) ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा.
उत्तर:

ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय पुढील प्रमाणे आहेत.

१)सूर्यग्रहण तसेच चंद्रग्रहणे या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यात शुभ- अशुभ असे काहीही नसते.

२) लोकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी त्यांना ग्रहणांविषयीचे अधिक ज्ञान पाठ्यपुस्तकातील आकृतींद्वारे समजावून सांगणे.

३) भित्तीपत्रके, पुस्तके, चलतचित्रे यांच्या माध्यमातून ग्रहणांविषयी अधिक माहिती देणे.



(४) सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल?
उत्तर:

सूर्यग्रहण पाहताना पुढील काळजी घ्यावी.

१) सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरावे जेणेकरून सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना होणारी इजा कमी होईल.



(५) उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील?
उत्तर:

१)उपभू स्थितीमध्ये खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील

Post a Comment

0 Comments